ठळक मुद्देअडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते.  

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुस-यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराचे एक नवे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. होय, नुकतेच तिने अण्डरवॉटर फोटोशूट केले. या फोटोशूटदरम्यान  समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या. तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट केला. समीराला ९ वा महिना सुरु आहे. याआधी कोणत्याही अभिनेत्रीने नवव्या महिन्यात पाण्यात जाऊन फोटोशूट केलेले नाही.


या फोटोशूटचे फोटो शेअर करताना समीराने लिहिले की, मी ९ महिन्यांची प्रेग्नंट आहे. हा महिना मला पूर्णपणे एन्जॉय करायचा होता. याच काळात आपण सर्वाधिक थकतो, दमतो. उत्साह असतो पण सोबत भीतीही असते.  मला हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. यामुळे सकारात्मकताही येईल. कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या स्थितीत आणि साइजमध्ये असतो. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत स्वत:वर प्रेम करायला पाहिजे.’


 अनेकांनी या फोटोंवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी यावरून टीकाही केली आहे. ‘आता एवढेच पाहायचे राहिले होते, असे एकाले लिहिले.  तर काहींनी फोटोशूटच्या नावावर बाळाला का त्रास देते आहेस,असे लिहिले.


२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर समीरा बॉलिवूडपासून दूर झाली. यामागेही मुलाचे प्लॅनिंग हेच कारण होते. दुसºया प्रेग्नंसीची बातमी शेअर करताना समीरा यावर बोलली होती. हा आमचा प्लान्ड बेबी आहे. त्यामुळेच मी अनेक प्रोजेक्टला नकार दिला होता, असे तिने सांगितले होते.

अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक  अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते.  ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sameera reddy baby bump in bikini for stunning underwater photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.