साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी चर्चेत आली आहे. तिचा कोणता सिनेमा किंवा भूमिकेमुळे ती चर्चेत आली नसून ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. समांथाचे १० ची रिपोर्ट कार्ड व्हायरल झाले आहे. या कारणामुळे ती चर्चेत आहे. नेहमीच आपल्या आवडत्या कलाकारांविषयी सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो.

त्यांच्या लहानपणीचे फोटो पाहण्यापासून ते त्यांच्या शालेय जीवनातील सगळ्या गोष्टी वाचण्यात त्यांना रस असतो. त्यामुळे समांथाने १०वीत किती मार्क्स मिळवले होते हे जाणून घेण्याची उत्सुकता असणा-यांसाठी या व्हायरल रिपोर्ट कार्डमधून माहिती मिळु शकते.

लॉकडाऊनमुळे, सामंथा घरीच आहे आणि सोशल मीडियाद्वारे लोकांशी संवाद साधत असते. चेन्नईतील पल्लवाराम येथील एका युजरने समांथाचा रिपोर्ट कार्ड व्हायरल केला आहे.

हा रिपोर्ट कार्ड शेअर करत त्याने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.त्याने लिहिले की, 'टॉपर सर्वत्र टॉपर असतो'. समांथा ही आभ्यासातही हुशार होती. रिपोर्ट कार्डकडे बारकाईने पाहिले असता समांथाने इंग्रजीत 90 गुण, गणितामध्ये १००, भौतिकशास्त्र 84 आणि इतिहासात ९२ गुण मिळवले आहेत.

'मैया चेसवे', 'रंगस्थलम', 'नीथेन एन पोनसांथम', 'यतो वेल्लिपोइन्धी मनसु', 'सीतम्मा विट्ठितलो सिरिमल चेट्टू' यासारख्या सिनेमात समांथा झळकली आहे. या सिनेमातील तिच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली. आज तिच्या अभिनयामुळेच तिने रसिकांची पसंती मिळवली आहे. जगाच्या कानाकोप-यात आज समांथाचे चाहते आहेत.

सामन्था अक्केनेनी ही दक्षिण सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. सन 2017 मध्ये समांथाने नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले. हे दोघेही टॉलीवूडमधील सर्वात रोमँटिक कपलपैकी एक आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Samantha Akkineni's 10th marksheet went viral on social media, find out how many marks she got in which subject?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.