ठळक मुद्देसायशाने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली असून तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा रंगलेली असते. तिने अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या शिवाय या चित्रपटात काम केले होते.

सलमान खानच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. सलमानचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाते जोडण्यात आले आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे त्याचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. सलमानने बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याआधी त्याचे प्रेमप्रकरण शाहीन बानोसोबत सुरू होते. शाहीन बानो ही सायरा बानो यांची भाची असून तिने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

शाहीन बानो आणि सलमान खान कॉलेजमध्ये एकत्र होते. त्या वेळात ते दोघे नात्यात होते. एवढेच नव्हे तर सलमानच्या मैंने प्यार किया या चित्रपटातील सुमन या भूमिकेसाठी शायनाने ऑडिशन देखील दिले होते. पण या चित्रपटासाठी तिची निवड न होता या चित्रपटात भाग्यश्रीची वर्णी लागली. शाहीनने आई मिलन की रात, महासंग्राम यांसारख्या काही चित्रपटात काम केले होते. पण तिच्या चित्रपटांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. त्यामुळे तिने बॉलिवूडपासून दूर जाणेच पसंत केले. तिचे लग्न अभिनेता सुमीत सेहगलसोबत झाले होते. त्यांना सायशा ही मुलगी असून तिच्या जन्मानंतर काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला.  

सायशाने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली असून तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा रंगलेली असते. तिने अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या शिवाय या चित्रपटात काम केले होते. तसेच ती काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. तिचे लग्न तमीळ सुपरस्टार आर्या सोबत झाले असून तो तिच्यापेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे. 

सायशाने अखिल या तेलुगु चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयक्षेत्रातील करियरला सुरुवात केली होती. तिने दक्षिणेतील विविध भाषेत काम केले असले तरी तमीळ भाषेतील तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले आहे. तिने वनामगन या चित्रपटाद्वारे तमीळ इंडस्ट्रीत एंट्री केली होती. कडईकुट्टे सिंघम आणि जुंगा यांसारख्या तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. 

Web Title: salman khan's ex girlfriend Shaheen Banu's daughter Sayyeshaa pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.