सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच असल्याचे आरोप कलाकार करताना दिसत आहे. इथे टॅलेंट महत्त्व नसून कलाकारांची नातेवाईक, मुलं असलात तर तुम्हाला स्ट्रगल करायची गरज नाही असेच समीकरणच जणू बनले आहे. गेल्या काही महिन्यात अनेक स्टार किडसना कोणत्याही प्रकारचे स्ट्रगल न करता थेट बड्या बॅनरचे सिनेमे मिळाले आहेत. याची आज अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. अनेकांचा गॉ़फादर म्हणून ओळखला जाणारा सलमाननेही घराणेशाहीचे उत्तम उदाहण सा-यांसमोर ठेवले.

 

आयुष शर्मा या व्यक्तीला समान व्यतिरिक्त कोणीही ओळखत नव्हते. मात्र 'लव्हयात्री' सिनेमा करताच तो प्रकाशझोतात आला. सलमान खानचा जावाई असल्याचा त्याला फायदाच झाला. सलमानची बहीण अर्पिता खानचे आयुष शर्मासह लग्न झाले आहे. हे दोघे लग्नबंधनात अडकताच आयुष शर्मा रूपेरी पडद्यावर झळकला. ते कोणत्याही प्रकारचे स्ट्रगल न करता. 

आज असे अनेक प्रतिभावान कलाकारा आहे जे दिवस रात्र मेहनत करत एका संधीची वाट पाहात आहेत. मात्र या टॅलेंटला पुढे आणण्यासाठी त्यांना सलमानसारखा गॉ़डफादर नाही. अनेकांना संधीही मिळाल्या पण नंतर फारशा संधी मिळाल्या नाहीत या कारणामुळेही अनेकांनी बॉलिवूडला राम राम ठोकल्याची अनेक उदाहरणे आहेत.

 नव्या कलाकारांवरील अन्याय त्वरित थांबवा अन्यथा आणखी काही आत्महत्या होतील, अशी भीतीही अनेक कलाकारांनी व्यक्त केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणौत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली आहे.

 

सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील नेपोटिझम, गटबाजी जोरदार संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. या प्रकरणी करण जोहर आणि सलमान खान दोघांवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला. इंडस्ट्रीतला 'नेपोटिज्म' आजचा नाही तर अनेक दशकांपासून आहे. दरम्यान इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे. मात्र त्यांना देखील घराणेशाहीचा फटका बसल्याचे समोर येत आहे. 
 

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman khans Brother in-law got Loveyatri movie without any struggle, this is a great example of Bollywood Nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.