ठळक मुद्देशेराला सलमानकडून वर्षाला दोन कोटी रुपये म्हणजेच महिन्याला १६ लाख रुपये मिळतात

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमानचे चित्रपट नेहमीच १०० हून अधिक करोडचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर करतात. सलमान नेहमीच लोकांच्या मदतीसाठी देखील तत्पर असतो. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या काळात तो विविध माध्यमाद्वारे लोकांना मदत करत आहे. या सगळ्यामुळे सलमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याची एक झलक पाहाण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतात.

सलमान खान कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉडीगार्डशिवाय जात नाही. त्याच्या सिक्युरीटीसाठी अनेक बॉडीगार्ड असतात. पण या सगळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून एक बॉडीगार्ड त्याच्यासोबत सतत असतो या बॉडीगार्डचे नाव शेरा आहे. शेरा हा सलमानच्या सावलीप्रमाणे सतत त्याच्या सोबत असतो. सलमानसोबत सतत असणाऱ्या या शेराला किती मानधन मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? 

शेराचे मानधन हे कोणत्याही कॉपोर्रेटमध्ये उच्चपदावर असणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा देखील कित्येक पटीने जास्त आहे. शेराला सलमानकडून वर्षाला दोन कोटी रुपये म्हणजेच महिन्याला १६ लाख रुपये मिळतात असे वृत्त एशियानेट न्यूज या वेबसाईटने दिले आहे.

गेल्या अनेक वर्षांत शेरा हा सलमानच्या कुटुंबीयातील एक भाग बनला आहे. शेराच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सलमान देखील घरातील एका सदस्याप्रमाणे सामील होतो. सलमान कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी शेरा तिथे पोहोचून तिथली व्यवस्था पाहातो. शेराने १९९५ मध्ये सलमानच्या एका परदेशातील दौऱ्यासाठी त्याला त्याच्या कंपनीमार्फत सुरक्षा पुरवली होती. पण त्यानंतर शेराचे काम आवडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमानसोबतच आहे. सलमानच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला देखील आपल्याला त्याचे शेरासोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan's bodyguard Shera's salary will surprise you PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.