Salman khan veergati co star pooja dadwal Struggle for living | आर्थिक टंचाईमुळे सलमान खानच्या हिरोइनवर धुणं भांडी करण्याची वेळ, वाचा सविस्तर

आर्थिक टंचाईमुळे सलमान खानच्या हिरोइनवर धुणं भांडी करण्याची वेळ, वाचा सविस्तर

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र या गोष्टीला काही कलाकार अपवाद असतात.  कितीही केले तरी स्ट्रगल काही त्यांचा पिछा सोडत नाही. अशीच परिस्थिती सध्या अभिनेत्री पूजा डडवालवर ओढावली आहे. एकेकाळी सलमान खानच्या सिनेमा मुख्य भूमिकेत दिसलेल्या पूजावर खूपच हलाखीची वेळ आली आहे.

सलमान खानच्या 'वीरगति' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. दरम्यान तिला टीबी झाला. पण त्यावेळी तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. याची माहिती सलमानला मिळाल्यावर त्यानं तिची मदतही केली होती. आता या आजापणातून सावरल्यावर पूजा पुन्हा एकदा नव्यानं जीवनाची सुरुवात करु इच्छिते.

 

खरं तर चंदेरी दुनियेतील पूजाच्या करिअरची सुरुवात खूपच चांगली राहिली. पण नंतर सिनेमा किंवा टीव्ही मालिकांमध्ये म्हणावं तसं यश न मिळाल्यानं तिला हे क्षेत्र सोडावं लागलं.आर्थिक परिस्थिती देखील बेताची असल्याने नाइलाजानं ती सध्या वर्सोवामधील एका चाळीत राहावं लागत आहे. पूजाला एका कुटुंबाने आश्रय दिला असून त्या मोबदल्यात ती त्यांच्या घरातली भांडी घासणं, कपडे धुणं यासारखी लहान-मोठी काम करुन त्यांना मदत करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman khan veergati co star pooja dadwal Struggle for living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.