ठळक मुद्दे सध्या सलमान ‘दबंग 3’ या सिनेमात बिझी आहे.

सलमान खान आणि कतरीना कैफ एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. ‘मैंने प्यार क्यों किया’ हा दोघांचा पहिला एकत्र असा सिनेमा. यानंतर दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ‘युवराज’ या चित्रपटाच्या सेटवरून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. अर्थात कतरीना व सलमानने ही गोष्ट कधीही कबूल केली नाही. पण अनेक ठिकाणी सलमानच्या डोळ्यांतील कतरीनाबद्दलचे प्रेम दिसले. आता हेच बघा ना, कतरीनाने दिलेली एक भेटवस्तू सलमान आजही वापरतो, यावरून या नात्याची कल्पना यावी.


एका ताज्या मुलाखतीत खुद्द सलमानने हा खुलासा केला. या मुलाखतीत सलमान त्याच्या स्टाईलबद्दल बोलला. पण इथेही कतरीनाचा उल्लेख आलाच.  ‘सेलिब्रिटींनी कपडे रिपीट केलेत की, त्यांच्यावर टीका होते. पण मी अनेकदा एकच टी-शर्ट वारंवार घालतो.  आजही मी ते शूज वापरतो. जे मी 5 वर्षांपूर्वी घातले होते.  काळ्या टी शर्ट आणि जीन्समध्ये तुम्ही मला अनेक वर्ष पाहू शकता. माझे एक शर्ट 500 रुपयांचे असते आणि ते मी अनेक वर्ष वापरतो. यात चुकीच काहीही नाही. माझे बेल्ट सुद्धा 20 वर्ष जुने आहेत. कतरिनाने काही वर्षांपूर्वी दिलेला बेल्ट मी आजही वापरतो,’ असे सलमानने यावेळी सांगितले.


 सध्या सलमान ‘दबंग 3’ या सिनेमात बिझी आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडेचे आयकॉनिक कॅरेक्टर साकारताना दिसणार आहे.
‘दबंग 3’ मध्ये सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान दिसणार आहेत. तसेच मराठी सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होत आहे. साउथ सुपरस्टार प्रभुदेवा याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan still wear katrina kaif gifted belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.