सलमान खान नुकतंच 'राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. आता त्याने एक नवा सिनेमा साइन केलाय. अशी चर्चा आहे की, सलमान खान २०१८ साली आलेल्या सुपरहिट 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक 'अंतिम'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रिमेक हा मराठी सिनेमाची तंतोतंत कॉपी नसेल. तर यात राष्ट्रीय लेव्हलचा विचार करून काही बदल केले जातील. या सिनेमात सलमान खान एका पोलिसवाल्याची भूमिका साकरणार आहे. तर त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा गॅंगस्टरच्या भूमिकेत असू शकतो. या सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यात १५ नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकतं.

मुंबई मिररने दिलेल्या एका रिपोर्टनुसार एका सूत्राने सांगितलं की, पनवेल फार्महाऊसमध्ये ६ महिने घालवल्यानंतर आता सलमान पुन्हा सेटवर येण्यासाठी आणि आपलं बेस्ट काम देण्यासाठी उत्सुक आहे. सिनेमाची कथाही त्याला फार आवडली आहे. एका लहान गावातील पोलिसवाला गॅंगस्टर्सचा खात्मा करण्यासाठी कायदा हाती घेतो अशाप्रकारची ही कथा असेल.

सूत्राने सांगितले की, सध्या महेश मांजरेकर पोलीस आणि गॅंगस्टर्स यांच्यातील लढाई विस्तारात वर्णन करण्यात बिझी आहेत. सिनेमात पाहुण्या कलाकारांसाठी ए ग्रेट स्टार्सना लिस्ट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर स्क्रीप्टवरून काही मीटिंगही झाल्या आहेत. यानंतर टीमने स्क्रीप्टचं एक व्हर्जन फायनल केलं. 

आधी या सिनेमाचं टायटल 'गन्स ऑफ नॉर्थ'असं फायनल करण्यात आलं होतं. पण नंतर ते बदलून 'अंतिम' करण्यात आलं. सिनेमाचं शूटींग मुंबई आणि कर्जतमध्ये होणार आहे. सलमान जानेवारी २०२१ पर्यंत या सिनेमाचं शूटींग करेल. त्यानंतर सलमान त्याच्या आगामी 'टायगर' सिनेमाचं शूटींग करेल. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan to start shooting with Mahesh Manjrekar for Antim movie remake of Mulshi Patter from 15 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.