सलमान खानची बहीण अर्पिता खान दुस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. येत्या 27 डिसेंबरला  तिचे बाळ या जगात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. 27 डिसेंबर खान कुटुंबियासाठी तसाही आनंदाचा दिवस असतो. कारण त्या दिवशी भाईजान सलमान खानचा वाढदिवस असतो. त्यामुळे सलमानचा यंदाचा वाढदिवस जरा खास असणार आहे. याच दिवशी भाईजानचा बुहचर्चित 'दबंग 3' सिनेमाही रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यात बाळाच्या आगमनाने खान कुटुंबियांचाही आनंद द्विगुणित होणार हे मात्र नक्की.  तुर्तास याविषयी अर्पिता आणि आयुषने कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नसून याविषयी मौन बाळगले आहे. 


18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. 

सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल  होतात.  सलमान खान आणि त्याचा भाचा अहिल यांचे नाते ‘बी टाऊन’च्या कलाकारांसाठी एक उदाहरण असल्यासारखे म्हणावे लागेल. 

Web Title: Salman Khan Sister Arpita Khan and Aayush Sharma second baby to arrive on Bhaijaan Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.