ठळक मुद्देसलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानसोबत यात कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत.

लग्नाआधीच सलमान खानच्या घरी हलणार पाळणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच तुम्हाला दिली होती. शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर, एकता कपूर, सनी लिओनी या बी-टाऊन कलाकारांप्रमाणेच सलमानही सरोगसीच्या मदतीने  बाबा होणार, अशी ही बातमी होती. या बातमीत किती तथ्य आहे, हे सध्यातरी सांगता येणार नाही. पण हो, सलमान खानला बाबा व्हायचे आहे हे मात्र नक्की. अर्थात ‘कहानी में थोडा ट्विस्ट है’, याप्रमाणे सलमाननेही बाबा होण्यासाठी एक विचित्र अट ठेवली आहे.


होय, मुंबई मिररशी बोलताना सलमान यावर बोलला. मी सुद्धा अनेकांसारखा बाबा बनू इच्छितो. पण अडचण म्हणजे, बाळासोबत त्या बाळाची आईही माझ्यासोबत येईल आणि मला बाळाची आई सध्या तरी नको आहे. बाळाला आईची गरज असते, ही गोष्ट वेगळी, असे सलमान यावर म्हणाला.  मी बाबा बनलोच तर माझ्याकडे माझ्या बाळाची देखभाल करण्यासाठी अनेक लोक आहे. त्यामुळे मी बाबा बनलोच तर तशी अडचण नसावी, असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे, मी सध्या तरी लग्नाच्या मूडमध्ये नाही. पुढे कधी तरी लग्नाबद्दल मी विचार करेल, असेही त्याने सांगितले.


 सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानसोबत यात कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहे. भारत सिनेमात अ‍ॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan reveled that he doesnt want a mother to come along with his child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.