सलमान खानचं लग्न झाल्याचा दावा, दुबईत नूर नावाची पत्नी अन् १७ वर्षाची मुलगी; ‘भाईजान’चं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:52 PM2021-07-21T16:52:49+5:302021-07-21T16:54:38+5:30

Pinch 2: सलमान खानचं लग्न झालं आहे आणि त्याची सीक्रेट फॅमिली दुबईत राहते असा दावा करण्यात आला आहे.

Salman Khan Responds To Tweet Claiming He Has A Wife Named Noor And A 17-Year-Old Daughter In Dubai | सलमान खानचं लग्न झाल्याचा दावा, दुबईत नूर नावाची पत्नी अन् १७ वर्षाची मुलगी; ‘भाईजान’चं सडेतोड उत्तर

सलमान खानचं लग्न झाल्याचा दावा, दुबईत नूर नावाची पत्नी अन् १७ वर्षाची मुलगी; ‘भाईजान’चं सडेतोड उत्तर

Next
ठळक मुद्देबकरी ईदच्या निमित्ताने सलमान खानने या एपिसोडची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. दुबईमध्ये तुझी पत्नी नूर आणि १७ वर्षाची मुलगी आहे. ट्विटर युजरच्या दाव्यावर सलमान खाननं दिलं चोख उत्तर

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) एकीकडे टायगर ३ या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शो पिंचच्या दुसऱ्या सीजनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये दिसला. पिंच २ मध्ये अरबाज खान सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्विटवर गेस्टला प्रश्न विचारतात. यात काही ट्रोल्सचाही समावेश असतो. सलमान खानसोबत अरबाजने हेच केले.

एका ट्विटर युजरनं दावा केला की, सलमान खानचं लग्न झालं आहे आणि त्याची सीक्रेट फॅमिली दुबईत राहते. ज्यात त्याला १७ वर्षाची मुलगी आहे असं म्हटलं. त्यावर गेस्ट सलमान खाननंही मजेशीर उत्तर दिलं आहे. बकरी ईदच्या निमित्ताने सलमान खानने या एपिसोडची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. अरबाजने यावेळी सांगितले की, अधिकाधिक ट्विट पॉझिटिव्ह आहेत. परंतु काही ट्विट्स असे आहेत ज्यात अजब दावे करण्यात आले आहेत. एका युजरनं सलमान खानचं सीक्रेट लग्न झाल्याचा दावा केला आहे.

यूजरनं ट्विटमध्ये म्हटलंय की, कुठे लपून बसला आहे डरपोक, भारतात सर्वांना माहिती आहे दुबईमध्ये तुझी पत्नी नूर आणि १७ वर्षाची मुलगी आहे. भारताच्या लोकांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार? हा दावा ऐकून सलमान खानही अवाक् झाला. हे कोणाबद्दल आहे असं सलमानने विचारलं तर अरबाज म्हणाला तुझ्याबद्दल लिहिलंय. सलमान खान म्हणाला की, या लोकांकडे खूप माहिती आहे. हे बकवास आहे. मला माहिती नाही हे कुणाबद्दल बोलत आहेत. त्यांनी ही पोस्ट का केली? यावर मी काहीच बोलणार नाही असं पोस्ट करणाऱ्याला वाटतं का? असं सलमान म्हणाला.

तर माझी कुणीही पत्नी नाही. मी भारतात राहतो. ९ वर्षापासून गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. मी या माणसाच्या दाव्यावर काही बोलणार नाही. देशाला माहितीये मी कुठे राहतो. याचवेळी अरबाजने दुसऱ्या युजरचं ट्विट वाचून दाखवलं. त्यात लिहिलं होतं की, सलमान खानचं घर अय्याशीचा अड्डा आहे. त्यावर सलमान म्हणाला तुम्ही माझ्या घरात असं काय पाहिलं ज्यामुळे माझं घर अय्याशीचा अड्डा वाटलं. पिंच २ चे अनेक प्रोमोज याआधीच आले आहेत. दुसऱ्या सीजनमध्ये अनन्या पांडे, टायगर श्रॉफ, फरहान अख्तर, कियारा अडवाणी, राजकुमार राव आणि फराह खानसह आयुष्मान खुराना पाहुणे म्हणून आले आहेत.  

Web Title: Salman Khan Responds To Tweet Claiming He Has A Wife Named Noor And A 17-Year-Old Daughter In Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app