Salman khan refuse to take fees for shahrukh khan upcoming film pathan | 'भावा' तुझ्यासाठी कायपण!, शाहरूख खानच्या सिनेमासाठी सलमान खानने घेतलं नाही मानधन

'भावा' तुझ्यासाठी कायपण!, शाहरूख खानच्या सिनेमासाठी सलमान खानने घेतलं नाही मानधन

बॉलिवूडमध्ये शाहरुख खान  (Shahrukh Khan)  आणि सलमान खानमधील (Salman Khan) केमिस्ट्रीबद्दल नेहमीच चर्चा असते. बऱ्याचदा दोघांचे आपसात एकमेंकाशी पटत नसल्याचे कानावर येते पण हे खरं नाही. दोन्ही स्टार अभिनेते एकमेकांचा खूप आदर करतात. अलीकडेच बॉलीवूडचा दबंग खानने असे काही केले की त्यांच्या मैत्रीबाबत होत असणाऱ्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम लावला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार  दोनही खानमध्ये इतकी पक्की मैत्री आहे की शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमात काम करण्यासाठी कोणतेच मानधन घेतलं नाही.  

 शाहरुख खान आपल्या आगामी ‘पठाण’ सिनेमालाविषयी चर्चेत आहे.  'झिरो' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुखचा हा पहिला चित्रपट आहे.  या चित्रपटावरून अभिनेता तीन वर्षानंतर आपला अभिनय दाखवण्यास येत आहे.  शाहरुख खान तसेच सलमान खान यांच्यामुळेही 'पठाण' चित्रपट अधिक चर्चेत आहे.  दोघांना एकत्र पहाण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत.  या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करत आहे.  सलमानने फेब्रुवारीत त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.


यापूर्वी अशी चर्चा होती की सलमान खानने या चित्रपटासाठी बरीच रक्कम वसूल केली आहे.  पण बॉलिवूड हंगामा च्या ताज्या बातमीनुसार सलमान खानने या चित्रपटात पैसे न घेता काम केले आहे.  शूटिंग संपल्यानंतर आदित्य चोप्राने जेव्हा सलमान खानशी त्याच्या फीस बदल बोलण्यासाठी गेला असता सलमानने नकार दिला.  तो म्हणाला- 'शाहरुख माझ्या भावासारखा आहे. मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो.  पठाण या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख या चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका देखील एका एजंटच्या भूमिकेत असणार असून ती शाहरुख खानसोबत मिशनवर काम करते असे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman khan refuse to take fees for shahrukh khan upcoming film pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.