ठळक मुद्देतळमजल्यावर एन्टरन्स लॉबी, किचन आणि फॅमिली रूम असणार आहे. वरच्या पाच मजल्यामध्ये प्रत्येकासाठी बेडरूम आणि मोठाले लिव्हिंग रूम असणार आहे. तसेच 16 गाड्यांच्या पार्किंगसाठी देखील वेगळी जागा असणार आहे.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. सलमान हा बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक असला तरीही तो कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. पण सलमान खानला नुकतेच वांद्रे येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवर पाहाण्यात आले. यामुळे आता एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. सलमान खान आता त्याचे वांद्रेमधील गॅलेक्सी मधील घर सोडून आता या नवीन ठिकाणी शिफ्ट होणार आहे का अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. 

वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्याच्या जवळच एका इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याच कन्स्ट्रक्शन साईटवर सलमानला नुकतेच पाहाण्यात आले. सलमान या साईटवर खूप वेळ होता. सलमान खान आणि त्याची आई सलमा खान आणि वडील सलीम खान यांनी 2011 मध्ये वांद्रेतील समुद्र किनाऱ्याच्या जवळ चार हजार स्क्वेअर फूटची एक प्रॉप्रर्टी 14.4 करोडला विकत घेतली होती. या प्रॉपर्टीमध्ये दोन कॉटेजेस असून हे मुळचे मेरी क्लोटिडा बॅपिस्टा यांचे होते. त्यांनी मेरी परेरीया यांना 1956 मध्ये हे विकले. परेरीया यांच्या निधनानंतर ही प्रॉपर्टी त्यांची मुले सांभाळत होती. पण त्यांनी ही प्रॉपर्टी खारमधील सलीम शेख यांना 2005 मध्ये विकली. त्यांच्याकडूनच ही प्रॉपर्टी सलमानने 2011 मध्ये खरेदी केली. 

गेल्या वर्षी मिड डेने वृत्त दिले होते की, या जमिनीवर सहा मजल्याची बिल्डींग बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे एक प्लान पाठवण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या प्लाननुसार तळमजल्यावर एन्टरन्स लॉबी, किचन आणि फॅमिली रूम असणार आहे. वरच्या पाच मजल्यामध्ये प्रत्येकासाठी बेडरूम आणि मोठाले लिव्हिंग रूम असणार आहे. तसेच 16 गाड्यांच्या पार्किंगसाठी देखील वेगळी जागा असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर कोणतेही छप्पर न टाकता ते खुले ठेवण्याचे त्यांनी ठरवले आहे. 


Web Title: Salman Khan is ready to move out of his childhood home Galaxy; More details revealed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.