salman khan is planing to move out of galaxy apartment and ready for new house | सलमान खानचा पत्ता बदलणार! गॅलक्सी अपार्टमेंट सोडून भाईजान जाणार अलिशान बंगल्यात!!

सलमान खानचा पत्ता बदलणार! गॅलक्सी अपार्टमेंट सोडून भाईजान जाणार अलिशान बंगल्यात!!

ठळक मुद्देसलमानचे गॅलक्सी अपार्टमेंटशी खास नाते आहे. त्यामुळे इतका मोठा स्टार असतानाही दीर्घकाळापासून सलमान या साधारण फ्लॅटमध्ये राहतो आहे.

सलमान खान मुंबईत कुठे राहतो, हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान राहतो. पण आता लवकरच सलमानचा हा पत्ता बदलणार आहे. होय, बॉलिवूडचा ‘दंबग खान’ अर्थात सलमान खान लवकरच आपले जुने घर गॅलक्सी आपार्टमेंट सोडून दुस-या जागी शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. वांद्रयाच्याच चिंबई भागात सलमानचा अलिशान बंगला तयार होत आहे.

 मिड-डे ने दिलेल्या माहितीनुसार, अगदी अलीकडे सलमान खान  चिंबई भागात फिरताना दिसला होता. याठिकाणी सुरू असणाºया बांधकामाची पहाणी करण्यासाठी सलमान गेला होता. गेल्या काही दिवसांपासून सलमान नव्या जागेच्या शोधात  होता.
2011 मध्ये सलमान खानचे आई-वडील सलीम आणि सलमा खानने 4 हजार स्क्वेअर फीटचा भूखंड खरेदी केला होता. या जागेची किंमत सध्या 14.4 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या जागेवर सलमान व त्याचे कुटुंब एक पाच मजली इमारत बांधू इच्छितो. 

 बीएमसीला दिलेल्या प्लॅननुसार तळमजल्यावर फॅमेली रूम, पँट्री आणि एन्ट्रेस लॉबी अशी रचना असणार आहे. तर वरचे पाच मजल्यावर दोन बेडरूम असणार आहे. या ग्राऊंड प्लस पाच मजली बिल्डिंगमध्ये दोन बेसमेंट देखील असतील आणि याठिकाणी 16-16 चारचाकी गाड्यांकरिता पार्किंगची सोय दिली जाणार आहे. अशाप्रकारच्या घरासाठी भाईजानची अलिशान बंगल्यासाठी जोरात तयार सुरू आहे. खरे तर सलमान गॅलक्सी सोडून अन्य ठिकाणी राहायला जाणार, अशा चर्चा यापूर्वीही आल्या होत्या. पण सलमानचे गॅलक्सी अपार्टमेंटशी खास नाते आहे. त्यामुळे इतका मोठा स्टार असतानाही दीर्घकाळापासून सलमान या साधारण फ्लॅटमध्ये राहतो आहे.
सलमान सध्या ‘दबंग 3’ या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय तो ‘बिग बॉस 13’ होस्ट करतो आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan is planing to move out of galaxy apartment and ready for new house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.