Salman Khan Married Bilaspur Girl Know The Truth Of Viral Picture | सलमान खान सिंगल नसून झालंय त्याचं लग्न? वधूनं लग्नाच्या फोटोसोबत घेतली कोर्टात धाव

सलमान खान सिंगल नसून झालंय त्याचं लग्न? वधूनं लग्नाच्या फोटोसोबत घेतली कोर्टात धाव

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार असा प्रश्न सलमानला बऱ्याचदा विचारला जातो. मात्र त्याच्या उत्तराची वाट त्याचे चाहते आजही पाहत आहेत. याच दरम्यान दबंग खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत सलमान वराच्या गेटअपमध्ये दिसतो आहे. हा फोटो पाहून तुम्ही बुचकळ्यात पडला असाल ना की सलमानने लग्न कधी केलं? या फोटोमागचं खरं सत्य समोर आलं आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, बिलासपुर जिल्ह्यात बैकुंठपूरमधील पंडोपारा कालरी येथे राहणाऱ्या बसंतलालचं लग्न देवरा भैयाथानचं सूरजपूर येथे राहणाऱ्या राणीसोबत झालं होतं. बसंतलाल एसईसीएलमध्ये काम करत होता. मात्र २५ जुलै, २०१३ साली त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बसंतलालच्या घरतल्यांनी त्याच्या पत्नीला घरातून बाहेर हकलून लावले आणि सांगितले की त्याची पत्नी असल्याचं तिला मानत नाही. त्यानंतर हे प्रकरण बैकुंठपूरच्या कौटुंबिक न्यायालयात गेलं. राणीच्या सासरच्यांना तिला बसंतची नोकरी मिळू नये असं वाटत होते. त्यामुळे त्यांनी राणीला बसंतची पत्नी असल्याचं सिद्ध न करण्यासाठी खूप प्रयत्न केले. याचदरम्यान त्यांनी न्यायालयात राणीच्या खोट्या लग्नाचा फोटो सादर केला. हा फोटो पाहून वकील आणि जजदेखील चकीत झाले. या फोटोत दाखवलं होतं की राणीचं लग्न सलमान खान सोबत झाले आहे. 


राणीच्या सासरच्या मंडळींनी न्यायालयात सांगितलं की, त्यांचा मुलगा बसंतचं राणीसोबत कोणतंही नात नाही उलट तिचं नातं दुसऱ्या कोणातरी व्यक्तीसोबत आहे. फोटो पाहून स्पष्ट समजलं होतं की, हा फोटो फोटोशॉपच्या मदतीनं बनवण्यात आलं होतं. त्यामुळे न्यायालयानं लग्नाचा हा फोटो खोटा असल्याचं सांगितलं आणि निकाल राणीच्या बाजूने लावला.


राणीच्या सासरच्या मंडळींनी बैकुंठपूर कौटुंबिक न्यायालयाच्या विरोधात हायकोर्टात अपील केलं आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan Married Bilaspur Girl Know The Truth Of Viral Picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.