52 वर्षांच्या भाग्यश्रीने बिकिनीत दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 03:29 PM2021-09-16T15:29:55+5:302021-09-16T15:30:19+5:30

Bhagyashree : तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीनंतरही दिसते इतकी सुंदर...

salman khan maine pyar kiya fame bhagyashree latest bikini pics are viral on internet | 52 वर्षांच्या भाग्यश्रीने बिकिनीत दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटो पाहून थक्क व्हाल

52 वर्षांच्या भाग्यश्रीने बिकिनीत दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटो पाहून थक्क व्हाल

Next
ठळक मुद्दे ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला तेव्हा भाग्यश्री उणीपुरी 19-20 वर्षांची होती. या चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवलं.

1989 मध्ये आलेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील प्रेम आणि सुमनची जोडी आठवते ना? या जोडीने प्रत्येक वयोगटातील सिनेप्रेमींच्या मनात जागा मिळवली. प्रेमच्या भूमिकेतील सलमान खान आणि सुमनची व्यक्तिरेखा रंगवणारी भाग्यश्री (Bhagyashree)हे दोघेही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. सलमानचा हा पहिला सोलो चित्रपट होता तर भाग्यश्रीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले, बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम नोंदवले. अर्थात याऊपरही प्रेम व सुमनची जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही.‘मैंने प्यार किया’नंतर सलमानची गाडी सूसाट निघाली. याऊलट भाग्यश्रीचे यानंतरचे  कैद में बुलबुल, त्यागी, पायल  सारखे चित्रपट दणकून आपटले. पुढे तिच्या करिअरला ओहोटी लागली. यापश्चात भाग्यश्रीने हिमालय दसानीसोबत संसार थाटला.

‘मैंने प्यार किया’ या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्रीने  एकेकाळी भाग्यश्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते, पण अचानक ही भाग्यश्री बॉलिवूडमधून गायब झाली होती. पण 23 वर्षांनी तिचे कमबॅक झाले.  

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘थलायवी’ या कंगना राणौतच्या सिनेमात ती झळकली. पण तूर्तास भाग्यश्रीच्या या चित्रपटाची नाही तर तिच्या हॉट फोटोंची चर्चा आहे. होय, नुकतीच भाग्यश्री  आपल्या गर्लगँगसोबत एन्जॉय करताना दिसली. 52 वर्षांच्या भाग्यश्रीने यावेळी स्वीम सूटमध्ये अशा काही पोज दिल्या की, चाहतेही थक्क झालेत.

 ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला तेव्हा भाग्यश्री उणीपुरी 19-20 वर्षांची होती. या चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवलं. यश खुणावत असतानाच भाग्यश्रीने हिमालय दासानीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करून मोकळी झाली.लग्नानंतर ती काही सिनेमात ती झळकली. पण ते सर्व सिनेमे फ्लॉप झालेत आणि भाग्यश्री बॉलिवूडमधून बाद झाली. ही भाग्यश्री आता दोन मुलांची आई आहे. पण फिटनेस इतका की, भाग्यश्रीने पन्नाशी ओलांडलीये, हे सांगूनही पटणार नाही. तिचे स्वीमसूटमधील फोटो बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही लाजवणारे आहेत. 

Web Title: salman khan maine pyar kiya fame bhagyashree latest bikini pics are viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app