salman khan loses his temper when fan take selfie at ramesh taurani diwali bash | सई मांजरेकरसोबत पोज देत होता सलमान खान, चाहत्याने असे काही केले की भडकला भाईजान

सई मांजरेकरसोबत पोज देत होता सलमान खान, चाहत्याने असे काही केले की भडकला भाईजान

ठळक मुद्देसलमानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

सलमान खान सध्या ‘दबंग 3’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात सलमान सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर अशा दोघींसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिचा हा पहिला चित्रपट आहे. साहजिकच सलमान व सई सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सध्या तरी सलमान जिथे जाईल तिथे सई दिसतेच दिसते. अलीकडे सलमान व सई दोघेही रमेश तौरानी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत पोहोचले. यावेळी सलमानने सईसोबत मीडियाला अनेक पोज दिल्या. पण यावेळी एका चाहत्याने असे काही केले की, सलमान भडकला.


सलमान व सई मीडियाला पोज देत होते. यादरम्यान सई थोडी बाजूला झाली आणि हीच संधी साधून एक चाहता धावला व सलमानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. मग काय, चाहत्याचा हा प्रताप पाहून सलमान बिथरला. परिस्थिती बिघडण्यापूर्वी सलमानच्या सुरक्षारक्षकांनी लगेच मोर्चा सांभाळला आणि त्या चाहत्याला बाजूला केले.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून काही जणांनी सलमानची बाजू घेतलीय तर काहींनी सलमानला ट्रोल केले आहे. सलमान नेहमीच तोºयात वावरतो, अशा शब्दांत अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.
ज्या चाहत्यांच्या जोरावर सलमान स्टार झाला, त्या चाहत्यांसोबत त्याने सौजन्याने वागायला हवे. इतके संतापण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.  
सलमानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan loses his temper when fan take selfie at ramesh taurani diwali bash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.