salman khan launches grooming personal care brand frsh-ram | या ईदला सलमान खानचा सिनेमा नाही, पण तरीही भाईजान घेऊन आला ही नवीन गोष्ट

या ईदला सलमान खानचा सिनेमा नाही, पण तरीही भाईजान घेऊन आला ही नवीन गोष्ट

ठळक मुद्देखरे तर ईदच्या दिवशी सलमानचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे पोस्ट प्रॉडक्शनचे काम थांबले.

 भाईजान सलामन खान आणि ईद यांचे अनोखे नाते आहे. होय, ईद म्हटली की भाईजानचा सिनेमा हे गेल्या कित्येक वर्षाचे समीकरण ठरलेले होते.  यंदा कोरोना व लॉकडाऊन यामुळे ईदच्या दिवशी सलमानचा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण म्हणून सलमान गप्प कसा बसणार? ईदच्या पूर्वसंध्येला सलमान  आपल्या चाहत्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन आला. क्लोथिंग ब्रँडनंतर आता सलमानने स्वत:चा ग्रुमिंग अँड पर्सनल केअर ब्रँड लाँच केला. याचे नाव 'FRSH'.
या ब्रँडचे पहिले प्रॉडक्टही सलमानने लॉन्च केले, ते म्हणजे हँड सॅनिटायझर, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हँड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. ही वाढलेली मागणी बघता सलमाननेही पहिले प्रॉडक्ट म्हणून हँड सॅनिटायझरची निर्मिती केली.

सलमानने इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ शेअर केला. या ब्रँडची ओळख करून देताना सलमान म्हणाला, ‘हा तुमचा आणि माझा म्हणजे आपला ब्रँड आहे. तुमच्यासाठी आणखी खूप काही आणले जाईल, सध्या तरी सॅनिटायझर घेऊन आलो आहे. हे तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही सुरक्षित आणि स्वच्छ राहाल.’
सलमानचा ‘बीईंग ह्युमन’ हा कपड्यांचा ब्रँड आधीच लोकप्रिय आहे. या ब्रँडने बाजारपेठे दबदबा निर्माण केल्यानंतर सलमानने अलीकडे ज्वेलरी क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. आता त्याने 'FRSH' हा ग्रूमिंग ब्रँड आणला आहे.

खरे तर ईदच्या दिवशी सलमानचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे पोस्ट प्रॉडक्शनचे काम थांबले आणि त्यामुळे हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होऊ शकला नाही. पण सलमान  चाहत्यांना फार निराश न करता एक खास गाणे लॉन्च करणार आहे. हे गाणे येत्या काही क्षणात लॉन्च होईलच. तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan launches grooming personal care brand frsh-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.