सलमान खान सोबत वीरगति चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल मागील काही दिवसांपासून आजारामुळे चर्चेत आली होती. तिला टीबी झाला होता आणि ती रुग्णालयात दाखल होती. तिच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते. यावेळी सलमान खान तिच्या मदतीला धावून आला आणि त्याने पूजाची मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून ती हलाखीचं जीवन जगत होती.


बरी झाल्यानंतर पूजा कामाच्या शोधात होती. तिने बऱ्याच ऑडिशन दिल्या. आता तिला सलमानच्या चित्रपटात काम मिळालं आहे. पूजाने एका मुलाखतीत सांगितलं की, मी एक चित्रपट साईन केला आहे. मात्र आता या चित्रपटाबद्दल आता कोणतीच माहिती देऊ शकत नाही. मी आता कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेन. सर्व काही नीट असेल तर या महिन्याच्या अखेरीस शूटिंगला सुरूवात होईल.


ती पुढे म्हणाली की, मी बऱ्याच निर्मात्यांना भेटले. त्या सर्वांनी मला काम देण्याचे वचन दिले आहे. मी चित्रपटाव्यतिरिक्त टेलिव्हिजनवरही काम केले आहे. यावेळी मला कामाची खूप गरज आहे. मी लोकांना हेच सांगेन की जर माझ्या लायकीचं काही काम असेल तर मला कोणताही रोल असेल तर मला काम द्या.


आता माझ्याकडे जो सिनेमा आहे तो लघुपट आहे. त्यात माझा रोल फक्त आठवड्याचा आहे. आता मी पूर्णपणे फिट आहे. कोणत्याही प्रकारची भूमिका, जी माझ्या वय व पर्सनॅलिटीमध्ये फिट बसेल ती मी चांगल्याप्रकारे करेन. मी सलमान खानलाही भेटण्याचा प्रयत्न करत आहे. या शॉर्टफिल्म व्यतिरिक्त दिल्लीतील एक निर्माते विजय शेखरजीसोबत म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसंदर्भात बातचीत सुरू आहे. मला जे काही काम मिळतंय ते मी सुरू करत आहे.


पूजाने वीरगति, हिंदुस्तान, सिंदुर की सौगंध, घराना यासारख्या मालिकेत काम केले आहे. पूजाने आजारातून बरी झाल्यानंतर एका मित्राच्या मदतीनं टीफिनचं काम सुरू केलं होतं. आता पूजाला काम मिळायला सुरूवात झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan Heroine Pooja Dadwal Sign A Short Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.