सलमान खानने कित्येक वर्ष व्यक्त केले नव्हते प्रेम, पण आता ती समोर आली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:30 PM2021-09-21T20:30:45+5:302021-09-21T20:31:28+5:30

सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Salman Khan had not expressed love for many years, but now she came forward and ... | सलमान खानने कित्येक वर्ष व्यक्त केले नव्हते प्रेम, पण आता ती समोर आली आणि...

सलमान खानने कित्येक वर्ष व्यक्त केले नव्हते प्रेम, पण आता ती समोर आली आणि...

Next

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर खासगी आयुष्यामुळे. सलमानचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो. पण आता सलमान खानच्या त्या प्रेमाबद्दल सर्वांना माहिती झाले आहे. सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचे सलमान खान होस्ट करत आहे. यादरम्यान एका भागात अभिनेता अजय देवगण आणि काजोलने हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. सलमान खानने सांगितले की त्याला एक मुलगी खूप आवडायची पण त्याने कधीच त्या मुलीसमोर आपल्या प्रेमाचा खुलासा केला नाही. 


सलमान खानने त्याचे प्रेम कधीच व्यक्त केले नाही. कारण जेव्हा १५ ते २० वर्षांनंतर तो त्या मुलीला भेटला तोपर्यंत ती मुलगी आजी झाली होती. यावर सलमान खान म्हणाला, 'जर तेव्हा मी माझे प्रेम व्यक्त केले असते तर मी आज आजोबा झालो असतो.' सलमानचा हा खुलासा ऐकल्यानंतर काजल आणि अजयला हसू आवरले नाही. 

अभिनेता सलमान खान याचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. अंतिम सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून हा चित्रपट मराठी सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Salman Khan had not expressed love for many years, but now she came forward and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app