तेरे नाम चित्रपटातील निर्जरा म्हणजेच अभिनेत्री भूमिका चावला आठवत असेल ना... भूमिकाने सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील सलमान खान व भूमिकाचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं. बॉलिवूडमध्ये पहिलाच हिट चित्रपट दिल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यापासून गायब झाली आहे. लग्नानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला आहे. नुकतीच ती मुंबईतील एका थिएटरबाहेर स्पॉट झाली. यावेळी तिच्यासोबत तिचा पाच वर्षांचा मुलगादेखील सोबत होता. तिने काळ्या रंगाचा टॉप व जिन्स परिधान केली होती. 


चाळीस वर्षीय भूमिका चावला हिने आपल्या करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं. पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या भूमिकाचा पहिला चित्रपट युवाकुडु हा होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या कुशी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

भूमिकाने अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं होतं. त्यानंतर तिला तेरे नाम चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. तेरे नाममधील तिच्या अभिनयाचं सगळीकडून खूप कौतूक झालं. त्यानंतर तिला हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकल्या नाहीत.


प्रोफेशनल लाईफशिवाय भूमिकाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी भूमी योगाचे धडे गिरवित होती. भरत ठाकूर तिचे योगा ट्रेनर होते. योगा शिकता शिकता भूमिकाचा ट्रेनरवर जीव जडला. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर भूमिकाने भरतसोबत लग्न केलं.


भूमिका व भरत यांचं लग्न नाशिकमधील देवलानी गुरूद्वारात झाली. लग्नाच्या सात वर्षांनंतर २०१४ साली भूमिकाने एका मुलाला जन्म दिला.

सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीसोबत वैवाहिक जीवन एन्जॉय करते आहे. 


Web Title: Salman Khan Film Tere Naam Actress Bhumika Chawla Look Change Now
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.