Salman khan film Radhe: Your Most Wanted Bhai Trailer Out | Radhe Trailer : या ट्रेलरमध्ये काय नाही? अ‍ॅक्शन आहे, स्वॅग आहे आणि खास म्हणजे सलमान खान आहे!

Radhe Trailer : या ट्रेलरमध्ये काय नाही? अ‍ॅक्शन आहे, स्वॅग आहे आणि खास म्हणजे सलमान खान आहे!

ठळक मुद्देयेत्या 13 मे रोजी थिएटर आणि ओटीटी अशा दोन्हींवर हा सिनेमा एकाचवेळी रिलीज होतोय. 

सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रदर्शित ‘राधे: मोर वॉन्टेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला. भाईजान सलमानचे चाहते अगदी आतुरतेने या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. या ट्रेलरमध्ये काय नाही? अ‍ॅक्शन आहे, स्वॅग आहे आणि सर्वात खास म्हणजे सलमान खान आहे. ज्या सलमानच्या ‘भाईगिरी’वर फॅन्स फिदा होतात, ती ‘भाईगिरी’ पाहून साहजिकच चाहते खूश्श आहेत.
13 मे 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार, अशी कमिटमेंट सलमानने केली आहे आणि तो आपली ही कमिटमेंट पूर्ण करणार आहे. येत्या 13 मे रोजी थिएटर आणि ओटीटी अशा दोन्हींवर हा सिनेमा एकाचवेळी रिलीज होतोय. (Radhe: Your Most Wanted Bhai Trailer Out)

ट्रेलरमध्ये सलमान  दमदार एन्ट्री करताना दिसतो. मुंबईत ड्रग्जचा बिझनेस जोरात सुरू असतो. अशावेळी सलमान अर्थात राधे येतो आणि मुंबईतील ड्रग्ज माफियांचा सफाया करण्यासाठी कंबर कसतो. या ट्रेलरमध्ये सलमान 12 वर्षापूर्वीच्या राधेच्या अंदाजात दिसतो तर त्याच्या देहबोलीत ‘वॉन्टेड’ची छाप दिसते. जॅकी श्रॉफ यात सीनिअर आॅफिसर बनला आहे तर दिशा पाटनी ही जॅकीची बहीण दाखवलेली आहे. जी सलमानच्या प्रेमात वेडी झाली आहे. रणदीप हुड्डा यात ड्रग्ज कार्टेलचा बॉस बनला आहे. ‘राधे- द मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर पाहून तुम्हाला ‘वॉन्टेड’ या सिनेमाची आठवण येईल. यात सलमान त्याचे काही सुपरहिट डायलॉग्स पुन्हा एकदा ऐकवतो. जॅकलिन फर्नांडिसच्या आयटम सॉन्गची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

फॅन्स खूश्श


राधेचा ट्रेलर पाहून सलमानचे फॅन्स खूश्य झाले आहेत. ट्रेलरचे कौतुक करताना ते थकत नाहीयेत. लव्ह यू भाई, ब्लॉकबस्टर अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. एकदम फाडू ट्रेलर, मजा आ गया... असे एका युजरने लिहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman khan film Radhe: Your Most Wanted Bhai Trailer Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.