बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात फक्त सलमानच्याच नाही तर मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीचीदेखील खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेनं रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता.  

'बजरंगी भाईजान' चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४ वर्षे उलटले आहेत. या ४ वर्षांत मुन्नीच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. 


हर्षाली आता ११ वर्षांची झाली असून ज्यावेळी तिने या चित्रपटाचं शूटिंग केलं होतं त्यावेळी ती फक्त ७ वर्षांची होती.


सलमान खानची मुन्नी आता खूप स्टाइलिश झाली आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. बजरंगी भाईजान चित्रपटाआधी तिने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकेत 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' व सावधान इंडियाचा समावेश आहे. 


मात्र बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेतून हर्षाली खूप लोकप्रिय झाली. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 


'बजरंगी भाईजान'च्या सेटवर हर्षाली रिकाम्या वेळेत सलमान खान व कबीर खानच्या चित्रपटात बार्बीवाले गेम्स खेळत होता. तसेच ती सलमान खानसोबत टेनिसदेखील खेळायची.


चित्रपटात जेव्हा ती सलमानला फायटिंग किंवा इमोशनल सीन करताना पहायची तेव्हा तिला रडू कोसळायचे. मग सलमान तिची समजूत काढायचा. जेव्हा हर्षालीला कोणता सीन समजला नाही तर ती कबीर खानकडे जायची आणि सीन समजून घ्यायची.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan Film Bajrangi Bhaijaan Munni Harshali Malhotra Look Change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.