salman khan and jacqueline fernandez quarantine period panvel farmhouse video gda | Lockdown मध्ये या अभिनेत्रीसोबत दिसला सलमान, फार्म हाऊसमधला Video लीक

Lockdown मध्ये या अभिनेत्रीसोबत दिसला सलमान, फार्म हाऊसमधला Video लीक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची फॅनफॉलोईंग संपूर्ण जगभरात आहे. त्यामुळे सलमानचा कोणताही सिनेमा रिलीज होण्याआधीच तो चर्चेत असतो. सलमानने आगामी सिनेमा राधेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित या सिनेमात सलमानची मुख्य भूमिका आहे. कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. 


राधेचे शूटिंग थांबल्यानंतर सलमान सध्या त्याच्या पनवेलमधल्या फॉर्म हाऊसवर पोहोचला आहे. इकडे सलमान क्वारांटाईन वेळेचा आनंद घेतो आहे. सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता खान आहे आणि आयुष्य शर्मादेखील आहेत. त्याचबरोबर त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससुद्धा स्पॉट झाली आहे. जॅकलिनचे नुकतेच 'गेंदा फूल' हे साँग रिलीज झाले आहे. त्यामुळे जॅकने या गाण्याचा सिंगर बादशाहला व्हिडीओ कॉल केला आणि या व्हिडीओ कॉलमध्ये तिच्यासोबत सलमान खानसुद्धा दिसतो आहे. रिपोर्टनुसार सलमान खानचे वडील सलीम खान सध्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एकटेच आहेत. 


सलमान खानच्या राधेबाबत बोलायचे झाले तर राधे चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होणार असून सलमान खान या चित्रपटात एक नाही दोन नाही तर चक्क तीन खलनायकांसोबत दोन हात करताना दिसणार आहे. या तीन खलनायकांच्या भूमिकेत असणार आहेत रणदीप हुड्डा, गौतम गुलाटी आणि सिक्किमचा अभिनेता सांग हे. एवढेच नाही तर, या मध्ये तीन वेगवेगळे एक्शन निर्देशक आहेत, ज्यांनी या चित्रपटातील एक्शन दृश्य कोरियोग्राफ केली आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan and jacqueline fernandez quarantine period panvel farmhouse video gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.