ठळक मुद्देलवकरच एकताच्या ‘मिशन ओवर मार्स’ या वेबसीरिजमध्ये साक्षी दिसणार आहे.

अभिनेत्री साक्षी तन्वर आणि एकता कपूर एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी आहेत. दीर्घकाळापासून दोघी एकमेकींसोबत काम करत आहेत. एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये साक्षीने काम केलेय. पण एकेकाळी एकताच्या नावानेच साक्षी थरथर कापायची. 
होय, हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द साक्षीने हा खुलासा केला.  ‘आधी माझी व एकताची मैत्री एकदम प्रोफेशनल होती. सेटवर एक वा दोनदा आम्ही भेटलो होतो. सेटवरची प्रत्येक व्यक्ती एकताला घाबरायची,’असे तिने सांगितले. इतकेच नाही तर एकदा एकताच्या एका कॉलनंतर तिची झालेली अवस्थाही तिने सांगितली. होय, एकताचा कॉल आला आणि तिचे बोलणे ऐकून साक्षी जागच्या जागी भीतीने थरथर कापू लागली.

साक्षीने सांगितले, ‘एकता तरूण होती, अगदी तेव्हाही तिला पाहिले की, सगळ्यांना धडकी भरायची. एकताचा कॉल आला म्हणजे, तुम्हाला ओरडा पडणार, हे ठरलेले असायचे. काही महिन्यांपूर्वी एकताने माझा एक सीन पाहिला. तो तिला अजिबात आवडला नाही. ती प्रचंड संतापली. तिने लगेच मला कॉल केला. हे काय केलेस? हे तिचे पहिले वाक्य होते. तिचे ते वाक्य ऐकून मी थरथर कापू लागली होती. तो सीन पुन्हा शूट करू, असे मी एकताला म्हणाले. पण तिने नकार दिला. नाही, पुन्हा तो सीन शूट होणार नाही. तू काय केलेस, हे लोकांनाही कळू दे, असे ती मला म्हणाली होती.’

एकताचा ‘कहानी घर-घर की’ या मालिकेसंदर्भातील एक किस्सा सांगताना साक्षी म्हणाली, ‘कहानी घर-घर की या मालिकेचा टीआरपी 21 वरून 20 वर घसरला होता. टीआरपी घसरला की एकता सेटवर यायची आणि मालिका बंद करण्याची धमकी द्यायची. 16 तास काम केल्यानंतर आम्ही पुन्हा प्रत्येक सीन नव्याने शूट करायचो. जेणेकरून आमचे काम एकता आवडेल.’ 

आता एकताचा राग बराच शांत झाला आहे. आता सर्व लोकांवरचा दबाव ती समजू शकते. प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही बाबतीत ती आता बरीच समजूतदार झाली आहे, असेही साक्षी म्हणाली.
लवकरच एकताच्या ‘मिशन ओवर मार्स’ या वेबसीरिजमध्ये साक्षी दिसणार आहे.


Web Title: sakshi tanwar reveals how ekta kapoor behaves when she got angery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.