Saif ali khan's reaction to daughter sara and kartik aaryan's love aaj kal trailer | 'लव आजकल'मधील लेक सारा अली खानचा बोल्ड अंदाज बघून सैफने केले धक्कादायक वक्तव्य
'लव आजकल'मधील लेक सारा अली खानचा बोल्ड अंदाज बघून सैफने केले धक्कादायक वक्तव्य

अभिनेता सैफ अली खान सध्या 'तान्हाजी' सिनेमामध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर तान्हाजीने चांगलाच धूमाकुळ घातला आहे. अमर उजाल्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान सैफ अली खानला नुकताच रिलीज झालेल्या लव आजकलच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यात सारा आणि कार्तिकने बोल्ड सीन्स दिले आहेत. सैफ म्हणाला, ''मी सारा आणि कार्तिकला या सिनेमासाठी शुभेच्छा देतो, पण मला माझ्या सिनेमाचा ट्रेलर जास्त आवडला होता.'' सैफचे या वक्तव्यामुळे सैफला लव आजकलचा ट्रेलर जास्त आवडला नसल्याचे लक्षात येते.  


'लव्ह आज कल'च्या ट्रेलरमध्ये १९९० आणि २०२० मधल्या काळातील काहीशी टिपिकल आणि मॉर्डन लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. कार्तिकची सारा आणि आरुषीसोबत मजेशीर केमिस्ट्री पहायला मिळतेय. 'लव्ह आज कल'मध्ये काही जुन्या गाण्यांना रिक्रिएट करण्यात आले आहे. तसेच कार्तिकचे सारा व आरूषीसोबत चित्रपटात बरेच किसिंग सीनही पहायला मिळत आहेत.


'लव्ह आज कल'मध्ये सारा, कार्तिकशिवाय रणदीप हुड्डा, आरुषी शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा हा दुसरा सीक्वल आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी 'लव्ह आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Saif ali khan's reaction to daughter sara and kartik aaryan's love aaj kal trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.