Saif Ali Khan's Look From 'Tanhaji' Is Out & People Are Calling Him 'Gareebon Ka Jon Snow' | सैफ अली खान झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘गरिबों का जॉन स्रो’

सैफ अली खान झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘गरिबों का जॉन स्रो’

तानाजी: द अनसंग वॉरियर हा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अजय देवगण निर्मित या चित्रपटात अजय देवगण व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात अजय तानाजीच्या भूमिकेत असून सैफ अली खान हा राजपूत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. सैफचा उदयभान राठोड यांच्या भूमिकेतील लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण, नेमक्या याच लूकवरून सैफ ट्रोल होतोय. होय, त्याच्या या लूकवरून नेटक-यांनी सैफची चांगलीच फिरकी घेतली आहे. 

होय, नेटक-यांनी सैफच्या पात्राची तुलना ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील जॉन स्रो या पात्राशी केलेली आहे. त्याच्या या लूकवरचे भन्नाट मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.   ‘गरिबों का जॉन स्रो ’,‘थोडा सस्ता वाला’ अशा शब्दांत नेटक-यांनी सैफच्या या लूकची खिल्ली उडवली आहे.


१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. तानाजी: द अनसंग वॉरियर  हा अजयच्या कारकिर्दीमधील १०० वा चित्रपट आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तूर्तास सैफवरचे मीम्स पाहा आणि पोटभर हसा... वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saif Ali Khan's Look From 'Tanhaji' Is Out & People Are Calling Him 'Gareebon Ka Jon Snow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.