saif ali khan wanted to rename taimur to faiz will kareena kapoor consider this name to second child | तैमूरसाठी सैफने सुचवले होते ‘हे’ नाव, दुसऱ्या मुलासाठी करिना करणार का या नावाचा विचार?

तैमूरसाठी सैफने सुचवले होते ‘हे’ नाव, दुसऱ्या मुलासाठी करिना करणार का या नावाचा विचार?

ठळक मुद्दे 2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते.

सैफ अली खान व करिना कपूर नुकतेच आई-बाबा झालेत. गेल्या 21 तारखेला करिना कपूरने दुसऱ्या  मुलाला जन्म दिला.  दुसऱ्या  बाळाच्या जन्माने पतौडी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सैफिनावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे सोशल मीडियावर सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन, याची चर्चा सुरु झाली आहे. बेबो आपल्या दुसऱ्या  मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
पहिल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याचे जाहिर करताच करिना व सैफ प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर या नावावरून मोठा वादही झाला होता. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण या वादानंतर सैफने आपल्या मुलाचे तैमूर हे नाव बदलण्याचा विचारही केला होता.

खरे तर सैफने पहिल्या मुलासाठी वेगळेच नाव सुचवले होते. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत खुद्द करिनाने याबद्दल सांगितले होते. ‘तैमूरच्या जन्माआधी सैफने एक नाव पसंत केले होते. मुलगा झाल्यास त्याचे नाव फैज ठेवावे, अशी त्याची इच्छा होती. फैज हे काव्यात्मक नाव आहे, अधिक रोमॅन्टिक आहे, असे त्याचे मत होते. मात्र मला माझ्या मुलाचे नाव तैमूरच ठेवायचे होते. मी ते आधीच ठरवले होते. तैमूरचा अर्थ पोलाद असा होतो. माझा मुलगा पोलादासारखा कणखर असावा, अशी माझी इच्छा होती,’ असे करिना म्हणाली होती.
 आता करिना व सैफला दुसरा मुलगा झाला आहे. अशात यावेळी त्याचे नाव सैफच्या पसंतीचे असू शकते. कदाचित करिना यावेळी सैफने सुचवलेल्या फैज या नावाचा विचार करू शकते.


  
2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटले जाते. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचे नाव ठेवावे, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता.    

करिना कपूर इतक्यात करणार नाही बाळाच्या नावाचा खुलासा, जाणून घ्या काय आहे कारण?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: saif ali khan wanted to rename taimur to faiz will kareena kapoor consider this name to second child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.