saif ali khan tandavs imdb ratings drop to 3.5 | हिंदू धर्माची थट्टा करणे पडले महाग, ‘तांडव’ला IMDbवर केवळ 3.5 रेटींग

हिंदू धर्माची थट्टा करणे पडले महाग, ‘तांडव’ला IMDbवर केवळ 3.5 रेटींग

ठळक मुद्देयाआधी अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘पाताललोक’ आणि ‘अ सूटेबल बॉय’ या वेबसीरिजवरूनही असाच वाद निर्माण झाला होता.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान  स्टारर वेब सीरीज ‘तांडव’ला  देशभरासह उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’वर हिंदू देवी-देवतांचा अपमान आणि जातिगत भावना भडकवल्याच्या आरोप होत असून ही वेब सीरीज बॅन करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. या सीरिजविरोधात देशभरात विविध ठिकाणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. या वादाचा परिणाम ‘तांडव’च्या आयएमडीबी रेटींगवरही झालेला दिसतोय. या सीरिजला केवळ 3.5 आयएमडीबी रेटींग मिळाले आहे. लोक ‘तांडव’ बॅन करण्याची मागणी करत आहेत आणि याचा परिणाम रेटींगवर झालेला दिसतोय.


याआधी अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘पाताललोक’ आणि ‘अ सूटेबल बॉय’ या वेबसीरिजवरूनही असाच वाद निर्माण झाला होता. या वेबसीरिजमध्येही हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप झाला होता.

का होतोय विरोध?

अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजला इतका विरोध का होतोय, हे अद्यापही अनेकांना माहित नाही. तर ‘तांडव’च्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता जीशान अय्यूब याला भगवान शिवाच्या गेटअपमध्ये प्ले करताना दाखवण्यात आले आहे. यादरम्यान तो अनेक आक्षेपार्ह विधान करतो. नेमक्या याला लोकांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनीही या सीरिजला जोरदार विरोध केला आहे. सीरिजमधील भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. अभिनेता जिशान अयूब याला यासाठी माफी मागावी तसेच सीरिजच्या निमार्ता व दिग्दर्शकाने हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: saif ali khan tandavs imdb ratings drop to 3.5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.