‘तांडव’ वादावर बोलून फसला राजू श्रीवास्तव, नेटकऱ्यांनी असा घेतला क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 06:01 PM2021-01-21T18:01:28+5:302021-01-21T18:02:11+5:30

अचानक तुझ्यात हिंदू देवदेवतांबद्दल आस्था कशी काय निर्माण झाली? असा बोचरा सवाल नेटक-यांनी त्याला केला.

Saif Ali Khan repeatedly does the same thing – comedian Raju raging on actor on the pretext of 'Tandava' | ‘तांडव’ वादावर बोलून फसला राजू श्रीवास्तव, नेटकऱ्यांनी असा घेतला क्लास

‘तांडव’ वादावर बोलून फसला राजू श्रीवास्तव, नेटकऱ्यांनी असा घेतला क्लास

googlenewsNext
ठळक मुद्देसीरिजमधील वादग्रस्त दृश्य हटवून चालणार नाही. आता कठोर शिक्षा मिळायला हवी. पुन्हा कोणी अशी हिंमत करणार नाही, असा कायदा व्हायला हवा,’ असे राजू श्रीवास्तवने त्याच्या व्हिडिओत म्हटले आहे.

‘तांडव’ या वेबसीरिजवरून सध्या नवा वाद उफाळला असताना या वादात कॉमेडियन राजू  श्रीवास्तवने उडी घेतली आणि नेमकी हीच उडी त्याच्या ट्रोलिंगसाठी कारणीभूत ठरली. होय, ‘तांडव’च्या निमित्ताने राजू श्रीवास्तवने या वेबसीरिजच्या मेकर्सवर तोंडसुख घेतले. एक व्हिडीओ शेअर करत त्याने ‘तांडव’ ची निंदा केली. ‘जब कॉमेडी त्रासदी में बदल जाती है,’ अशा कॅप्शनसह त्याने हा व्हिडीओ शेअर केला. पण त्याचा हा व्हिडीओ लोकांच्या पचनी पडला नाही. हा व्हिडीओ शेअर करताच राजू श्रीवास्तव ट्रोल झाला.

अचानक तुझ्यात हिंदू देवदेवतांबद्दल आस्था कशी काय निर्माण झाली? असा बोचरा सवाल नेटक-यांनी त्याला केला. इतके कमी की काय म्हणून नेटक-यांनी राजू श्रीवास्तवचे जुने व्हिडीओ शोधून काढले. या व्हिडीओ राजू श्रीवास्तव स्वत: रामायण, महाभारतावर विनोद करताना दिसतोय. मग काय, या जुन्या व्हिडीओवरून नेटकºयांनी राजूचा चांगलाच क्लास घेतला.

तुझ्या इतके रामायणावर अन्य कोणीही व्यंग केले नाही. प्रभु रामाचा हा अपमान तुला योग्य वाटतो का? असे एका युजरने लिहिले. तू सुद्धा हिंदूंच्या कमी भावना दुखावल्या नाहीस, असे अन्य एकाने सुनावले.

‘तांडव’ वादावर काय म्हणाला राजू श्रीवास्तव?
‘दरवेळी सैफ अली खान वेबसीरिजमध्ये अशा गोष्टी करतो. कारण त्याला रोखणारे, अडवणारे कोणी नाही. कुठला कायदा नाही. हिंदू धर्म सहिष्णू आहे. हिंदूंचे मन मोठे आहे म्हणून प्रत्येकवेळी लोक त्याला माफ करतात. पण आता वेळ आलीये. हिंदूंनो जागे व्हा. सीरिजमधील वादग्रस्त दृश्य हटवून चालणार नाही. आता कठोर शिक्षा मिळायला हवी. पुन्हा कोणी अशी हिंमत करणार नाही, असा कायदा व्हायला हवा,’ असे राजू श्रीवास्तवने त्याच्या व्हिडिओत म्हटले आहे.
  
 

Web Title: Saif Ali Khan repeatedly does the same thing – comedian Raju raging on actor on the pretext of 'Tandava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.