ठळक मुद्देमाझ्या वडिलांच्या लग्नात सगळ्यात सुंदर लहेंगा मी घालावा असे माझ्या आईचे म्हणणे होते. मी आणि माझ्या आईने आमच्या लॉकरमध्ये जाऊन लग्नासाठी मी कोणती ज्वेलरी घालणार याची निवड केली होती.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी काही वर्षांपूर्वी गाजतवाजत लग्न केले. सैफचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. त्याच्या आणि करिनाच्या लग्नाच्यावेळी सैफची मुले सारा आणि इब्राहिम चांगलेच मोठे होते. त्या दोघांनीही त्यांच्या वडिलांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

सारा अली खानला सैफ आणि करिनाच्या लग्नात कोणी तयार केले होते याविषयी खुद्द सारानेच कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले होते. साराने या कार्यक्रमात सांगितले होते की, या लग्नासाठी तिला तिची आई अमृता सिंगने तयार केले होते. आता साराने सैफच्या लग्नाविषयी आणखी देखील काही गोष्टी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. तिने म्हटले आहे की, या लग्नात सगळ्यात सुंदर लहेंगा मी घालावा असे माझ्या आईचे म्हणणे होते. मी आणि माझ्या आईने आमच्या लॉकरमध्ये जाऊन लग्नासाठी मी कोणती ज्वेलरी घालणार याची निवड केली होती. तसेच आईने अबू आणि संदिप या प्रसिद्ध डिझायनर्सना बोलावून सांगितले होते की, सैफ लग्न करत आहे आणि त्याच्या लग्नात साराने सगळ्यात चांगला लेहंगा घालावा अशी माझी इच्छा आहे.

सैफ आणि अमृता सिंग यांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या घरातून विरोध होता. सैफ आणि अमृता यांच्यामध्ये अमृता 12 वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याने त्याने तिच्यासोबत लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट 2004 मध्ये झाला आणि 2012 मध्ये सैफने करिनासोबत लग्न केले. सैफ आणि करिनाची जोडी त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. सैफ आणि करिनाच्या लग्नानंतर सैफची मुले सारा आणि इब्राहिम यांचे करिनासोबत खूपच चांगले नाते आहे. त्या दोघांना अनेकवेळा सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर अली खान याच्यासोबत देखील पाहाण्यात येते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saif Ali Khan-Kareena Kapoor marriage: Amrita Singh orders the most beautiful lehenga for daughter Sara Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.