ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. तिच्या या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. यानंतर सारा रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’मध्ये झळकली. या दोन्ही चित्रपटातील साराच्या अदाकारीने सगळ्यांना वेड लावले. साराचा क्यूट चेहरा, चेह-यावरचे तितकेच क्यूट हसू चाहत्यांना घायाळ करून गेले. आज आम्ही साराचे बालपणीचे काही क्यूट फोटो घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा साराच्या प्रेमात पडाल.
 साराने आत्तापर्यंत केवळ दोन सिनेमे केलेत. पण या दोनच चित्रपटांनी बॉलिवूडची स्टार ही ओळख तिला दिला. लवकरच सारा कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह, आजकल’ या सिनेमात दिसणार आहे. पाठोपाठ ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्येही तिची वर्णी लागली आहे.

सगळ्यांची आवडती सारा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. सारा स्वत: 66 लोकांना फॉलो करते. पण तिच्या फॉलोअर्सची संख्या मात्र 1.52 कोटींच्या घरात आहे. 


 

गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरात आहेत.

गेल्या काही महिन्यांत सारा व कार्तिक अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. पण सूत्रांचे मानाल तर असे काहीही नाही. उलट सारा व कार्तिक न्यू इअर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. या सेलिब्रेशनचा प्लानही त्यांनी तयार केला आहे

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: saif ali khan daughter sara ali khan throwback viral photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.