Saif Ali Khan and Rani Mukerji in 'Bunty Aur Babli 2'? | १४ वर्षांनंतर 'बंटी और बबली'चा येणार सीक्वल, अभिषेक बच्चनऐवजी दिसणार हा अभिनेता?
१४ वर्षांनंतर 'बंटी और बबली'चा येणार सीक्वल, अभिषेक बच्चनऐवजी दिसणार हा अभिनेता?

अभिषेक बच्चनराणी मुखर्जी यांचा चित्रपट 'बंटी और बबली' २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनववर चित्रीत झालेलं गाणं कजरा रे आजही रसिकांच्या ओठांवर रुळताना पहायला मिळतं. या गाण्यात ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चन व अमिताभ बच्चन वेगळ्याच अंदाजात पहायला मिळाले होते. आता १४ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सीक्वल बनवण्याबाबत बोललं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंटी और बबलीच्या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चनऐवजी सैफ अली खान व राणी मुखर्जी ही जोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. स्पॉटबॉयच्या माहितीनुसार, सैफ अली खानने अभिषेक बच्चनची जागी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर राणी मुखर्जी व सैफ अली खान या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील आठवड्यात बनारस व बुलंद शहरमध्ये सुरूवात करणार आहेत.


सैफ व राणी यांनी यापूर्वी हम तुम, तारा रम पम आणि थोड़ा प्यार थोड़ा मॅजिक या चित्रपटात काम केलं आहे. ते दोघे जर एकत्र काम करणार असतील तर तब्बल ११ वर्षांनी एकत्र येणार आहेत. बंटी और बबलीच्या सीक्वलची निर्मिती यशराज फिल्म्स करणार आहे.  


बंटी और बबली चित्रपटाच्या सीक्वलची अधिकृतरित्या घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Web Title: Saif Ali Khan and Rani Mukerji in 'Bunty Aur Babli 2'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.