ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये करिना कपूर आणि सैफ अली खानने गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. दोघेही बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीअनुष्का शर्मा आईबाबा झालेत. नुकताच अनुष्काने एका गोंडस चिमुकलीला जन्म झाला. मुलीच्या जन्माचा आनंद विराटने चाहत्यांसोबत शेअर केला. पण यानंतर सर्वात आधी एक काम केले. ते म्हणजे, मीडिया व फोटोग्राफर्सला पर्सनल नोट लिहून  मुलीचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली. आमच्या मुलीच्या खासगीपणाचा सन्मान करा, असे आवाहन विरूष्काने केले. आता विरूष्काने जे केले, तेच सैफिना करताना दिसणार आहेत.

होय, करिना कपूर व सैफ अली खान लवकरच आईबाबा होणार आहेत. करीना  फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तैमूरला सैफिनाने मीडियापासून कधीही लपवले नाही. पण आता दुसऱ्या बाळाला मात्र मीडियापासून दूर ठेवण्याचा त्यांचा इरादा पक्का असल्याचे कळतेय.  

तैमूरसोबत जे काही झाले, आपल्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीच होऊ न देण्याचा निर्णय सैफ व करिनाने घेतला आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्याबाळाच्या प्रायव्हसीबाबत ते कठोर पावलं उचलणार आहेत, अशी माहिती आहे.
करिना दुस-यांदा आई होणार आहे तर सैफ चौथ्यांदा बाबा बनणार आहे. सैफ पहिल्यांदा 1995 साली बाबा बनला होता. त्याची एक्स-वाईफ अमृता सिंगने सारा या पहिल्या मुलीला जन्म दिला होता. यानंतर 2001 साली अमृताने इब्राहिमला जन्म दिला होता. 2004 साली सैफ व अमृताचा घटस्फोट झाला. 2012 साली सैफने करिना कपूरशी लग्न केले. 2016 साली करिनाने तैमूरला जन्म दिला. सध्या करिना प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.

अनुष्काची डिलिव्हरी करणारे डॉक्टरच करणार करीनाची दुसरी डिलिव्हरी

सप्टेंबरमध्ये करिना कपूर आणि सैफ अली खानने गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. दोघेही बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. डॉ. रुस्तम फिरोझ सोनावाला यांनी करिनाची पहिली डिलिव्हरी केली होती. विशेष म्हणजे करिश्मा कपूर आणि करिनाच्या जन्मावेळी यांनीच आई बबिता कपूर यांची डिलिव्हरी केली होती. याशिवाय नीतू सिंह, गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलिव्हरी डॉ.सोनावाला यांनीच केली होती. दिव्य मराठीच्या रिपोर्टनुसार अनुष्काची पहिली डिलिव्हरी देखील डॉ. सोनावाला यांनीच केली आहे.

 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: saif ali khan and kareena kapoor will follow virat kohli and anushka sharma had plan this to wellcome new baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.