ठळक मुद्देकंपनीने करीना-सैफ या जोडीसोबत करारही केला आहे.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय. आता कदाचित हीच प्रसिद्धी तैमूर नाही पण त्याच्या मॉम-डॅडच्या कामी आली आहे. होय, तैमूरच्या  मॉम-डॅडला एका जाहिरातीपोटी 1.5 कोटी रूपये मिळणार आहेत.


मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, एका बेबी केअर ब्रँडने केवळ आणि केवळ तैमूरमुळे त्याचे आईबाबा अर्थात सैफ अली खान व करिना कपूर यांना आपला चेहरा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या जाहिरातीसाठी सैफ व करिनाला या ब्रँडने 1.5 कोटींचे मानधन देऊ केल्याचे कळतेय.  डायपरच्या एका लोकप्रिय ब्रँडने करीना आणि सैफला आपला ब्रँड अम्बॅसिडर बनवले आहे.

याबाबत कंपनीने करीना-सैफ या जोडीसोबत करारही केला आहे. या ब्रँडच्या 3 तासांच्या कार्यक्रमासाठी करीना आणि सैफला दीड कोटी रुपये देण्यात येणार आहेत.


 सैफ अली खान आणि करीना कपूर हे आपल्या ब्रँडसोबत जोडले जावेत यासाठी बेबी केअर ब्रँडचे प्रमुख  गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते. सैफ आणि करीनाची असलेली लोकप्रियता आणि तैमूरची क्रेज हे यामागचे कारण आहे.  सुरुवातीला सैफ आणि करीनाने या बेबी केअर कंपनीचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र दुसºयांदा झालेल्या चर्चेनंतर मात्र या दोघांनी ही आॅफर स्वीकारली.

Web Title: saif ali khan and kareena kapoor got baby care brand ad because of taimur ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.