राज कुंद्रा प्रकरण : गहना वशिष्टच्या ‘त्या’ आरोपावर अभिनेत्री सई ताम्हणकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 12:36 PM2021-07-25T12:36:38+5:302021-07-25T12:38:14+5:30

Raj Kundra Porn Case : राज कुंद्राच्या पॉर्न व्हिडीओ प्रकरणावर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया, म्हणाली...

sai tamhankar on gehana vasisth raj kundra pornography case- | राज कुंद्रा प्रकरण : गहना वशिष्टच्या ‘त्या’ आरोपावर अभिनेत्री सई ताम्हणकरचा खुलासा

राज कुंद्रा प्रकरण : गहना वशिष्टच्या ‘त्या’ आरोपावर अभिनेत्री सई ताम्हणकरचा खुलासा

Next
ठळक मुद्देराज कुंद्रानं त्याच्या एका अ‍ॅपसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला विचारणा केली होती, असा दावा गहनानं केला होता.  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पोर्नोग्राफीप्रकरणी अटक झाल्यावर आता या प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात अटक झालेली व सध्या जामीनावर असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth)  हिने या प्रकरणी एक मोठा खुलासा केला होता. तिच्या या खुलाशाने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती. राज कुंद्रानं त्याच्या एका अ‍ॅपसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला  (Sai Tamhankar) विचारणा केली होती, असा दावा गहनानं केला होता.  आता सईनं यावर स्पष्टीकरण देत, गहनाचा दावा फोल ठरवला आहे.
 मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नसून, राजनं हॉटशॉटसंबंधी कुठलीही ऑफर दिली नव्हती, असं सईनं स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गहनाचा दावा खोटा असल्याचे सईच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या अ‍ॅपशी आपला काडीचाही संबंध नाही. मला कोणीही ऑफर दिली नाही वा विचारणा झाली नाही,असं सईच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय म्हणाली होती गहना?
गहनाने ‘नवभारत टाईम्स ऑनलाईन’ला नुकतीच मुलाखत दिली होती. मुलाखतीत तिनं अनेक खुलासे केले होते.  तुरूंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसला गेली होती. तो ‘बॉलीफेम’ नावाचं एक नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं मला यावेळी कळलं होतं. या अ‍ॅपवर अ‍ॅपवर आम्ही रिअ‍ॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो, फिचर फिल्म्स दाखवण्याची त्याची योजना होती. या चित्रपटांमध्ये कोणताही बोल्ड कंटेंट असणार नव्हता. या अ‍ॅपवरील  एका चित्रपटासाठी राजची मेव्हणी शमिता शेट्टी आणि आणखी एका चित्रपटासाठी सई ताम्हणकर यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं मला सांगण्यात आलं होतं.   मी हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते,असं गहना म्हणाली होती.

Web Title: sai tamhankar on gehana vasisth raj kundra pornography case-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app