एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर सुपरहिट ठरले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही महेश मांजरेकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महेश मांजरेकर यांच्यासोबत त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनीही काकस्पर्श, नटसम्राट या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारत सगळ्यांना भुरळ पाडली. चित्रपटसृष्टीत आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयात करिअर करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा महेश मांजरेकर यांच्या घरातही सुरु आहे. आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून महेश मांजरेकर यांचा थोरला मुलगा सत्या याने काही महिन्यांपूर्वी मराठी रुपेरी पडद्यावर केली. त्यानंतर आता मांजरेकर यांच्या कुटुंबातील सगळ्यात लहान सदस्य असलेली सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

सई मांजरेकर सलमान खानच्या दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

नुकतीच ती सलमान सोबत आयफा पुरस्कार सोहळ्यात गेली होती. त्यानंतर सलमान सोबत असलेली ही तरूणी कोण अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. सलमान खान व सई मांजरेकर यांनी आयफा पुरस्कार सोहळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

सईने नुकताच तिची आई मेधा मांजरेकरसोबतचा एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत त्या दोघींव्यतिरिक्त तिची बहिण गौरी इंगोलेही पहायला मिळतेय. हा फोटो शेअर करून तिने म्हटलं की, आम्हाला हे आईकडून मिळालं आहे. 

सई व सलमानने एकत्र अनेक पोज दिल्यात. सलमान खान ‘दबंग 3’ या चित्रपटातून सईला लॉन्च करत आहे. सईचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. सई या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सलमान व सईशिवाय सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सईचे बाबा अर्थात महेश मांजरेकर हेही कॅमिओ रोलमध्ये या चित्रपटात दिसणार आहेत.


महेश मांजरेकर व सलमान यांच्यात चांगली मैत्री आहे. मुलीच्या डेब्यूकडे महेश मांजरेकर जातीने लक्ष देत आहेत.

मुंबई मिररने दिलेले वृत्त खरे मानाल तर, महेश यांनी आपल्या मुलीसाठी ‘नो डेटींग क्लॉज’ जारी केला आहे. सईने केवळ आणि केवळ तिच्या अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्यावे, अशी महेश मांजरेकर यांची इच्छा आहे.

Web Title: Sai Manjarkar, who is seen with Salman, is very beautiful and glamorous, she says - we got this from our mother.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.