बॉलिवूडच्या सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या सिनेमांमध्ये 'सडक २' चा नंबर लागतो. पण कोरोनामुळे इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमालाही फटका बसला. त्यामुळे हा सिनेमा आताा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. सडक २ हा सिनेमा डिज्ने आणि हॉटस्टारवर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा या महिन्याच्या शेवटी २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे.सडक २' हा महेश भट्ट यांच्या 'सडक' सिनेमाचा सिक्वेल आहे.  पूजा भट्टदेखील या सिनेमात झळकणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून 'सडक २' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या सा-यांनाच प्रतिक्षा होती. यापूर्वी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र  या पोस्टरमध्ये कुणाचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. तरी पाठमोऱ्या व्यक्तींकडे पाहून दिसणाऱ्या 3 व्यक्ती आलिया, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर असल्याचा अंदाज सा-यांनाच होता.

नुकताच सिनेमातील मुख्य भूमिकेत असणारे संजय दत्त,  आदित्य रॉय कपूर  आणि आलिया भट्ट यांचे लूक समोर आले आहेत. या सिनेमाच्या स्टारकास्टचे तीन नवीन पोस्टर्स सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहेत.  रसिकांची सिनेमासाठी असणारी उत्सुकता पाहून खास चाहत्यांसाठी हे लूक प्रदर्शित करण्यात आली आहेत. 

'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. तर दुसरी बाब म्हणजे आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या दोन बहिणी पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमात दिसणार आहे. 'सडक' या सिनेमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. यातील गाणीही सुपरहिट झाली होती. आता इतकी मोठी स्टार कास्ट असल्यावर हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sadak 2 first looks: Alia Bhatt, Sanjay Dutt, Aditya are on journey of love, redemption. See pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.