ठळक मुद्देबेतालच्या ट्रेलरमध्ये एव्हरिथिंग इज फाईन असे तो सगळ्यांना म्हणताना आपल्याला दिसत असून त्याचा हा अंदाज लोकांना भावत आहे. या वेबसिरिजमध्ये जितेंद्रची भूमिका काय आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

बार्ड ऑफ ब्लड या वेबसिरिजच्या यशानंतर नेटफ्लिक्स आणि रेड चिलिज आता बेताल ही वेबसिरिज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. शाहरुख खान प्रोडक्शनच्या या वेबसिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या ट्रेलरविषयी लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. कारण ही वेबसिरिज खूपच हटके असल्याचे हा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे. ही झोम्बी हॉरर सिरिज असून २४ मे ला दुपारी १२.३० वाजता ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

बेतालचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून सगळीकडेच या वेबसिरिजची चर्चा रंगली आहे. यात विक्रम सिरोही मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड ट्रेनिंग घेतली आहे. तर लिपस्टिक अंडर माय बुरखा फेम आहाना कुमरा देखील यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या वेबसिरिजमध्ये अनेक कलाकार प्रोस्थेटिक मेकअपमध्ये दिसत असून सगळ्या कलाकारांसाठी हा एक वेगळा अनुभव आहे. तसेच सुचित्रा पिल्लई, अजय मुधलवान, मंजिरी पुपाला यांसारखे कलाकार देखील या वेबसिरिजचा भाग आहेत. या वेबसिरिजच्या ट्रेलरमध्ये दिसणारा एक कलाकार सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशी आपल्याला या वेबसिरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. 

प्रेक्षकांचा लाडका जितेंद्र जोशी नेटफ्लिक्सच्या वेबसिरिजमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. सेक्रेड गेम्स या वेबसिरिजमधील त्याने साकारलेली काटेकरची भूमिका चांगलीच गाजली होती. आता बेतालच्या ट्रेलरमध्ये देखील तो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेलरमध्ये एव्हरिथिंग इज फाईन असे तो सगळ्यांना म्हणताना आपल्याला दिसत असून त्याचा हा अंदाज लोकांना भावत आहे. या वेबसिरिजमध्ये जितेंद्रची भूमिका काय आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sacred games katekar aka jitendra joshi in shahrukh khan's Betaal PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.