ठळक मुद्देघटस्फोटानंतर सैफने तो इटालियन मॉडेल रोजासोबत नात्यात असल्याचे मीडियाला सांगितले आणि ते दोघे एकत्र राहू देखील लागले. पण त्याचे हे नाते अधिक काळापर्यंत टिकू शकले नाही

सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी काही वर्षांपूर्वी गाजतवाजत लग्न केले. सैफचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. अमृता आणि सैफ यांच्यात अमृता ही वयाने मोठी आहे. एका चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या भेटीनंतर सैफने काही दिवसांपूर्वी फोन केला आणि अमृताला डिनरला जाण्याविषयी विचारले. त्यावेळी अमृताने सैफला घरीच जेवायला बोलावले. त्या डिनरनंतर अमृता आणि सैफच्या गप्पा इतक्या रंगल्या की, तो दोन दिवस घरी गेलाच नाही. त्यानंतर काहीच वर्षांत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.सैफ आणि अमृता त्यांच्या आयुष्यात प्रचंड खूश होते. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. घटस्फोटानंतर सैफने तो इटालियन मॉडेल रोजासोबत नात्यात असल्याचे मीडियाला सांगितले आणि ते दोघे एकत्र राहू देखील लागले. पण त्याचे हे नाते अधिक काळापर्यंत टिकू शकले नाही आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.टशन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करिना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिने मी सर्व ते प्रयत्न केले. जेव्हा माझे प्रेम मी व्यक्त केले त्यावेळी करिना कपूर मला प्रपोज करतेय यावर माझा विश्वासच बसत नाही, असे सैफने म्हटले होते.'' शूटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफने लग्नासाठी प्रपोज केल्याचे करिनाने सांगितलं.पुढे करिना म्हणाली होती, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफने मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतरही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती. सैफलाही या गोष्टीपासून काही प्रोब्लेम नव्हता. त्यामुळेच आम्ही लग्न करण्याचे ठरवले.

Web Title: Rosa is the real reason fro saif ali khan and amrita singh divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.