सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकमेकांच्या खूप जवळ होते. ते दोघे एकत्र वर्कआऊट, पार्टी व व्हॅकेशनवर जात असत. इतकंच नाही तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचंही बोलले जात होते. आता काही दिवसांपूर्वी रियाचा बर्थडे होता, पण तिने यावेळी साजरा केला नाही. रियाच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पाहिले असतील त्यातील बरेच व्हिडिओ सुशांतच्या घरात बनवल्याचे बोलले जात आहे.

रियाने हे व्हिडिओ शेअर केले आहेत आणि शूट करण्याचे क्रेडिट सिद्धार्थ पिटानीला दिले आहे. सिद्धार्थ सुशांतचा मित्र आहे आणि त्याच्यासोबत रहात होता.


रियाने मुंबई पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले होते की सुशांत कोणत्या तरी कारणामुळे त्रस्त होता. पण याबद्दल तो काहीच सांगायचा नाही. तो जास्त त्रस्त असेल तर तो एकटा निघून जायचा किंवा पुण्यातील फार्महाऊसवर जात होता. जेव्हा तो जास्त डिप्रेशनमध्ये राहू लागला तेव्हा त्याने डॉक्टरकडे उपचार घ्यायला सुरूवात केली होती. मागील काही दिवसांपासून त्याने औषधे घेणे बंद केले होते.

रियाने पुढे सांगितले की, 6 जूनला सुशांतने तिला घरातून जाण्यासाठी सांगितले. त्याला एकट्याला रहायचे होते.

रिया म्हणाली की सुशांतची परिस्थिती पाहून ती जास्त काहीच बोलली नाही. तिला वाटलं की सुशांत काही एकटा राहिल तर त्याला बरे वाटेल. त्यानंतर रिया तिथून निघून गेली आणि 14 जूनला सुशांतने आत्महत्या केल्याचे वृत्त आले.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riya Chakraborty's video goes viral, shoot at Sushant Singh Rajput's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.