ritu nanda passes away raj kapoor daughter and amitabh bachchan daughter shweta bachchan nanda mother-in-law passed away | राज कपूर यांची लेक रितु नंदा यांचे निधन; कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
राज कपूर यांची लेक रितु नंदा यांचे निधन; कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

ठळक मुद्देएकाच दिवसांत 17000 पेन्शन पॉलिसीज विकल्याबद्दल रितु नंदा यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती.

दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर यांची मुलगी तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिच्या सासूबाई रितु नंदा यांचे आज निधन झाले. आज सकाळी रितू नंदा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून कॅन्सरला झुंज देत होत्या. काही तासांपूर्वी अभिनेता रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत, रितु नंदा यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. सोबत नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनीही सोशल मीडियाद्वारे रितू नंदा यांना श्रद्धांजली दिली.


नीतू कपूर यांनी रितु यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, ‘माझी प्रिय... तुझ्या आत्म्यास शांती लाभो,’ असे लिहिले.
रितु नंदा यांना निखील  आणि नताशा अशी दोन मुले आहेत. राजन यांचा मुलगा निखील नंदा अमिताभ यांचा जावई आहे. (अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चनचे निखीलसोबत लग्न झाले आहे. ) 2018 मध्ये रितु नंदा यांचे पती राजन नंदा यांचे निधन झाले होते. राजन नंदा एस्कॉर्ट्स  ग्रूपचे चेअरमॅन होते. 

गिनीज बुकमध्ये नावाची नोंद
एकाच दिवसांत 17000 पेन्शन पॉलिसीज विकल्याबद्दल रितु नंदा यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती. 80 च्या दशकात एलआयसीच्या एजंट म्हणून त्यांनी काम सुरु केले होते. अनेक वर्षे त्यांनी हे काम केले. यानंतर त्यांनी स्वत:ची एक खासगी विमा कंपनीही सुरु केली होती. 1969 मध्ये त्यांनी प्रतिष्ठित सुरक्षा एजन्सी एस्कॉर्ट्स  ग्रूपचे मालक राजन नंदा यांच्यासोबत विवाह केला होता. आठ वर्षांपूर्वी रितु यांना कॅन्सरने गाठले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुुरू होता.

Read in English

Web Title: ritu nanda passes away raj kapoor daughter and amitabh bachchan daughter shweta bachchan nanda mother-in-law passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.