riteish deshmukh troll to siddharth malhotra on his old pic | Marjaavaan Movie : हाय मैं मरजावां! सिद्धार्थ मल्होत्राचा हा फोटो बघून रितेश देशमुखने घेतली मजा
Marjaavaan Movie : हाय मैं मरजावां! सिद्धार्थ मल्होत्राचा हा फोटो बघून रितेश देशमुखने घेतली मजा

ठळक मुद्दे‘मरजावां’ या सिनेमात सिद्धार्थसोबत रितेश देशमुखही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट या तिघांचा एकत्र डेब्यू झाला होता. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा या तिघांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर आलिया व वरूणच्या करिअरची गाडी सूसाट सुटली. पण सिद्धार्थला मात्र अद्यापही तो सूर गवसला नाही. अलीकडचे सिद्धार्थचे काही चित्रपट फ्लॉप झालेत. आता त्याचा आणखी एक नवा सिनेमा  प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘मरजावां’. साहजिकच सिद्धार्थला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण तूर्तास सिद्धार्थ या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे.
होय, सिद्धार्थने अलीकडे त्याचा मॉडेलिंगच्या दिवसातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत सिद्धार्थने सिल्व्हर टाईट शॉट्स आणि ट्रान्सपरन्ट टी-शर्ट परिधान केला आहे. त्याच्यासोबतची मॉडेलही अशाच काहीशा लूकमध्ये आहे. या फोटोवरून अभिनेता रितेश देशमुखने सिद्धार्थची चांगलीच मजा घेतली आहे. 

‘हाय मैं मरजावां, सिद्धार्थ मल्होत्रा. उफ्फ ये तो पोजिंग की हाईट हो गई,’ असे रितेशने या फोटोवर कमेंट देताना लिहिले आहे. रितेशच्या या कमेंटवर सिद्धार्थनेही जशास तसे उत्तर दिले आहे. रितेशचा एक जुना फोटो शेअर करत, ‘हाय मैं डर जावां रितेश देशमुख, ये हाईट तो मैं मॅच नहीं कर पाऊंगा,’ असे सिद्धार्थने लिहिले आहे. एकंदर काय तर सध्या रितेश व सिद्धार्थची ही ‘जुगलबंदी’ चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.
मरजावां’ या सिनेमात सिद्धार्थसोबत रितेश देशमुखही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तो यात विलेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. उद्या शुक्रवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय.

Web Title: riteish deshmukh troll to siddharth malhotra on his old pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.