riteish deshmukh shares funny video of wife genelia d'souza | जेनेलिया वहिनीचा दरारा भारी, रितेश देशमुखची तर बोलती बंद झाली...! पाहा धम्माल व्हिडीओ

जेनेलिया वहिनीचा दरारा भारी, रितेश देशमुखची तर बोलती बंद झाली...! पाहा धम्माल व्हिडीओ

ठळक मुद्देजेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.  

रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूजा हे बॉलिवूडचे क्युट कपल आहे. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. इतकेच काय, आणखी असे व्हिडीओ बनवा, म्हणून लोक या जोडप्याकडे मागणी करतात. सध्या रितेश व जेनेलियाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडीओ शेअर करताना रितेशने दिलेले कॅप्शन तर आणखीच मजेदार आहे. ते वाचून तुम्हालाही त्याला दादा द्यावीशी वाटेल.

रितेशसमोर जेनेलिया उभी आहे आणि नॉनस्टॉप बडबडतेय. इतकी बडबड की, एका क्षणाला रितेशही कंटाळतो. तो जांगई देणार, तोच जेनेलिया त्याला खडसावते. मी बोलताना जांभई देणे थांबवणार आहेस का? असे ती त्याला म्हणते. यावर मी जांभई देत नाहीये, तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय..., असे रितेश म्हणतो. पण जेनेलिया वहिनी त्याला लगेच गप्प बसवते आणि तिची  बडबड अखंड सुरु राहते. बिचारा रितेश काय करणार? बायकोसमोर त्याचा नाईलाज होतो.
रितेश व जेनेनिया वहिनीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. काही तासांत अडीच लाखांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. यावरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचणे हेही एक मनोरंजन आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.
जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.  

Video : रितेश देशमुख व जेनेलियाची धम्माल पार्टी, ‘झिंगाट’ गाण्यावर ‘झिंगाट’ डान्स 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: riteish deshmukh shares funny video of wife genelia d'souza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.