Riteish Deshmukh Childhood Photo Viral On Social Media | कोण आहे हा चिमुकला ? जो आहे बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता !
कोण आहे हा चिमुकला ? जो आहे बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता !


कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी आणि फॅन्सशी संवाद साधत असतात. आपल्या जीवनातील घडामोडी, विविध फोटो, व्हिडिओ आणि आगामी प्रोजेक्टसची माहिती शेअर करत असतात. त्यामुळे फॅन्सना आपल्या लाडक्या कलाकाराची माहिती आणि त्यांचे कधीही न पाहिलेले रुप फोटो तसंच व्हिडिओमधून पाहायला मिळतं. नुकतंच सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील हे गुटगुटीत बाळ म्हणजे रूपेरी पडद्यावर  आपली लय भारी छाप उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख. 


त्याच्या बालपणीचा हा फोटो आहे. रितेश आता जितका हँडसम दिसतो, तितकाच तो बालपणी ‘गोंडस’ होता. त्याचा हा फोटो पाहून तुमच्याही तोंडून ‘क्यूट’ हा शब्द नक्की बाहेर पडेल. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा बालपणाचा फोटो पाहून त्याचे फॅन्सही खूश झालेत. गुटगुटीत आणि चेहऱ्यावर हसू असलेला रितेशचा हा फोटो फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू आहे. 

रितेशचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते. रितेशने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या पहिल्याच चित्रपटात रितेशला त्याची जीवनसंगिनी भेटली ती म्हणजे जेनेलिया. तब्बल 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने लग्न केले आणि त्यांच्या फॅन्सच्या आनंदावर पारावर उरला नाही. रितेश आणि जेनेलियाची जोडी बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते. 
 


Web Title: Riteish Deshmukh Childhood Photo Viral On Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.