rishi kapoor share a throw back pic of actor pran | ही कुणी अभिनेत्री नसून आहे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता, ऋषी कपूर यांनी दिलं ओळखण्याचं चॅलेंज
ही कुणी अभिनेत्री नसून आहे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता, ऋषी कपूर यांनी दिलं ओळखण्याचं चॅलेंज

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप जुना वाचतो आहे. यात एक महिला पहायला मिळते आहे.

हा फोटो शेअर करत ऋषी कपूर यांनी मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, मला तुम्ही सांगा हे कोण आहे? जर कोणाला दुसऱ्या सूत्रांकडून याबद्दल समजलं असले तर खुलासा करू नका. दुसऱ्यांचा सस्पेन्स खराब करू नका. ऋषी कपूर यांच्या ट्वीटवर लोकांनी खूप कमेंट केले आणि या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्नही केला. 

आता ऋषी कपूर यांनी हा व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा करत ट्विट केले आणि सांगितले की, या फोटोतील महिला दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्राण आहेत. त्यांनी ट्विट केलं की, हे कुणी दुसरं तिसरं नसून दिग्गज अभिनेते प्राण साहब आहेत, तुमच्यापैकी कुणी त्यांना ओळखलं असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा.
ऋषी कपूर यांनी पुढे ट्विट करत म्हटलं की, प्राण अंकल भ्रमित करण्यात माहिर होते. त्यांचा हा गेटअप कोणत्या चित्रपटासाठी नव्हता तर कुटुंबासोबत केलेली मस्करी होती. ऋषी कपूर यांच्या ट्विटवर लोकांनी खूप कमेंट केल्या आणि प्रतिक्रिया दिल्या.

प्राण यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या लग्नात वहिनीला फसविण्यासाठी महिलेचा वेश धारण केला होता. त्यांनी त्यांच्या वहिनीला हे सांगून फसविण्याचा प्रयत्न केला की ती त्यांच्या नवऱ्याचं जुनं प्रेम आहे. ही माहिती प्राण यांचा मुलगा सुनील सिकंद यांनी फोटो शेअर करून दिली.

Web Title: rishi kapoor share a throw back pic of actor pran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.