ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ऋषी कपूर सध्या जाम चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातील त्यांचे ट्विट. होय, ऋषी कपूर एकापाठोपाठ एक ट्विट करत आहेत. यामुळे ट्रोलही होत आहेत. तसेही ऋषी कपूर त्यांच्या रागासाठी ओळखले जातात़.त्यांच्या शीघ्रकोपीपणाच्या अनेक कहाण्या बॉलिवूडमध्ये ऐकवल्या जातात. एकदा तर ऋषी कपूर यांनी रागात आपल्या लाडक्या लेकाच्याच म्हणजे रणबीर कपूरच्या थोबाडीत हाणली होती. रणबीर कपूरने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

होय, एकदा रणबीर कपूरच्या घरी पूजा होती. रणबीर बराच लहान होता. पूजेत पायात जोडे-चपला घालून बसत नाहीत, हे न कळण्याइतपत लहान होता.  पूजा सुरु झाली आणि रणबीर पायात जोडे घालून पूजेला बसला. ऋषी कपूर यांना ते दिसले. ते इतके भडकले की, त्यांनी रणबीरच्या सणसणीत थोबाडीत हाणली. रणबीर आजही ती चपराक विसरू शकलेला नाही.
ऋषी कपूर अतिशय कडक शिस्तीचे असल्याने रणबीर व त्यांचे सुरुवातीच्या काळात फारसे पटले नाही. बापलेकांच्या नात्यात कायम एक दुरावा राहिला. पण आताश: हा दुरावा बराच कमी झाला आहे.

कतरीना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये असताना  रणबीर कपूर घर सोडून गेला होता.  रणबीरच्या घर सोडण्याच्या निर्णयासाठी ऋषी कपूर यांनी स्वत:ला जबाबदार ठरवले होते. होय, मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले होते. रणबीर खूप चांगला मुलगा आहे. मी त्याच्या करिअरमध्ये कधीच दखल दिली नाही. माझे त्याच्यासोबतचे संबंध बिघडले, याला मी जबाबदार आहे. माझी पत्नी मला सांगत राहिली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता, असे ऋषी कपूर या मुलाखतीत म्हणाले होते. अर्थात आता हे संबंध पूर्ववत झाले आहेत. रणबीर आपल्या घरी परतला आहे. ऋषी कपूर यांचा कॅन्सरचा उपचार सुरु असताना रणबीरने त्यांची प्रचंड सेवा केली. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात रणबीर आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. रिअल लाइफमध्ये रणबीर व आलिया एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असेही मानले जात आहे. अलीकडे रणबीर व आलियाच्या ब्रेकअपची चर्चा होती. पण लवकरच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rishi kapoor once slapped brahmastra actor ranbir kapoor for this reason-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.