Rishi Kapoor, Neetu Singh to finally return home after a year, Anupam Kher bids them heartfelt goodbye | ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी परतणार भारतात
ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी परतणार भारतात

ठळक मुद्देऋषी कपूर भारतात यायला निघाले असल्याचे अनुपम खेर यांनी ट्वीट करून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, नीतू कपूर आणि ऋषी कपूर तुमचा प्रवास चांगला होवो... तुम्ही भारतात जवळजवळ वर्षभरानंतर जात आहात...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत आहेत. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. पण ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना कॅन्सर असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यामुळे ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र काही महिन्यांपूर्वी खुद्द ऋषी कपूर यांनी स्वत: त्यांना कॅन्सर झाला होता, याची कबुली दिली होती. अनेक महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांना चाहते मिस करत आहेत. ते मुंबईत कधी परतणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. ते आजारातून पूर्णपणे बरे झाले असून लवकरच मुंबईत येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून मीडियात येत आहेत. पण आता ते मुंबईला येण्यासाठी निघाले असल्याचे खुद्द अनुपम खेर यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे.

अनुपम खेर गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये असून ते अनेकवेळा ऋषी कपूर आणि नितू सिंग यांच्यासोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. ऋषी कपूर भारतात यायला निघाले असल्याचे अनुपम खेर यांनी ट्वीट करून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, नीतू कपूर आणि ऋषी कपूर तुमचा प्रवास चांगला होवो... तुम्ही भारतात जवळजवळ वर्षभरानंतर जात आहात... खरं तर मी खूश आहे आणि मला वाईट देखील वाटत आहे. दोन्ही भावनांमध्ये मी गुंतलो आहे. मी तुम्हाला खूपच जास्त मिस करणार आहे. आपण जो एकत्र वेळ घालवला तो खूपच चांगला होता. धन्यवाद... माझ्या प्रार्थना आणि प्रेम नेहमीच तुमच्यासोबत राहाणार आहे.  

काही आठवड्यांपूर्वी शक्ती कपूरने द कपिल शर्मा शोमध्ये ऋषी कपूर यांच्याविषयी सांगितले होते की, मी रोज त्यांच्याशी बोलतो, ते लवकरच भारतात परतणार असून न्यूयॉर्कमध्ये बसल्या बसल्या त्यांनी दोन-तीन चित्रपट साईन केले आहेत.

Web Title: Rishi Kapoor, Neetu Singh to finally return home after a year, Anupam Kher bids them heartfelt goodbye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.