ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला दिली एव्हरग्रीन गाणी, ऐकून तुम्हीही म्हणाल- ओम शांती ओम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:16 AM2020-04-30T11:16:41+5:302020-04-30T11:17:28+5:30

ऋषी कपूर यांची गाजलेली गाणी

Rishi Kapoor gave evergreen songs to Bollywood, you will also say- Om Shanti Om TJL | ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला दिली एव्हरग्रीन गाणी, ऐकून तुम्हीही म्हणाल- ओम शांती ओम

ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला दिली एव्हरग्रीन गाणी, ऐकून तुम्हीही म्हणाल- ओम शांती ओम

googlenewsNext

 

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत बऱ्याच सिनेमात काम केले आहे. त्यांच्या बऱ्याचशा भूमिका गाजल्या आहेत. तसेच त्यांनी बॉलिवूडला एव्हरग्रीन गाणी दिली आहेत. ती गाणी कानावर पडली की तुम्हाला नक्कीच येईल त्यांची आठवण.

ऋषी कपूर यांनी सुपरहिट सिनेमे दिले आहेत पण त्यांनी चित्रपटात सुपरहिट गाणीदेखील दिली आहेत जी आजही प्रेक्षकांच्या घरात मन करून कायम आहेत. त्यांच्या काळात त्यांच्या सिनेमातील गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. ही आहेत त्यांची गाजलेली गाणी

मेरी उमर की नौजवानों हे गाणं आजही कित्येकांच्या ओठांवर रुळताना पहायला मिळते. हे गाणं 1980 साली प्रदर्शित झालेल्या कर्ज चित्रपटातील आहे.

 

प्रेमसरोग चित्रपटातील बनवारेने खिलाया फूल हे गाणं देखील खूप लोकप्रिय ठरले होते. हे गाणं ऋषी कपूर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर चित्रीत झाले होते.

 

प्रेमरोग सिनेमातील आणखीन एक गाणं खूप लोकप्रिय ठरले होते ते म्हणजे ये गलियां ये चौबारा.

 

प्रेमगंथ चित्रपटात माधुरी दीक्षित व ऋषी कपूर यांच्यावर चित्रीत झालेले गाणे इस दुनिया में हेदेखील गाणे आजही ऐकले जाते.

 

1985 साली प्रदर्शित झालेला चित्रपट सागरमधील ऋषी कपूर व डिंपल कपाडिया यांच्यावर चित्रीत झालेले एव्हरग्रीन गाणे सागर किनारे दिल ये पुकारे आजही अनेकांच्या मनात घर करून कायम आहे.

 

कभी कभी चित्रपटातील तेरे चेहरे से हे गाणं जे ऋषी कपूर व नीतू सिंगवर चित्रीत झाले होते. हे गाणे देखील आजही लोकप्रिय आहे.

 

ऋषी कपूर यांची याशिवाय बरीच गाणी आहेत जी लोकप्रिय ठरली होती.

Web Title: Rishi Kapoor gave evergreen songs to Bollywood, you will also say- Om Shanti Om TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.