ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाव तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येच्या धक्क्यातून त्याचे चाहते अद्यापही सावरलेले नाहीत. या प्रकरणामुळे कधी नव्हे इतक्या वादात सापडलेली सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिचे आयुष्य मात्र हळूहळू पूर्ववत होताना दिसतेय. नुकतीच रिया मुंबई एअरपोर्टवर दिसली आणि तिच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

एअरपोर्टवर रियासोबत तिचे वडील व भाऊ शौविक होता. यादरम्यान रियाने घातलेल्या टी-शर्टची जोरदार चर्चा रंगली. या टी-शर्टवर एक खास मॅसेज लिहिलेला होता. व्हाईट कलरच्या या टी-शर्टवर लाल रंगाने लिहिलेल्या या मॅसेजची चर्चा झाली नसेल तर नवल.

यावर इंग्रजीत ‘मेन अप’ अर्थात ‘मर्द बनो’ असे लिहिलेले होते. रियाचा हा मॅसेज कुणासाठी होता, हे माहित नाही. पण तूर्तास तिच्या या टी-शर्टचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधीही एनसीबीकडे चौकशीसाठी गेली असताना रियाच्या टी-शर्टवरच्या मॅसेजनी असेच लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाव तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर पडली होती. तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी रिया राहते घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty was seen mumbai airport message on her hoodie says man up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.